Snake Viral Video : फिलिपिन्सच्या एका शहरात लोकांना एक खतरनाक नजारा बघायला मिळाला. इथे एका रस्त्यावर असलेल्या तारावर एक भला मोठ्ठा साप दिसला. या तारेखालून लोक ये-जा करत होते. ही घटना १२ ऑक्टोबर २०२१ ची आहे. टॅगबिलरन सिटी, बोहोल, फिलिपिन्सची ही घटना आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, साप काही वेळासाठी तारावर लटकलेला दिसतो. तर स्थानिक लोक सापांचे व्हिडीओ काढत आहेत.
काही लोक घाबरून आरडाओरड करत आहेत. अशातच साप तारावरून खाली पडतो. लोक त्याला तिथे उभ्या असलेल्या वाहनांमध्ये शोधत आहेत. हा व्हिडीओ शुक्रवारी व्हायरल हॉग या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, '१२ ऑक्टोबर २०२१, मंगळवारी रात्री साधारण ६.३० वाजता. बोहोलच्या एका सार्वजनिक बाजारात एका साप एका तारावर लटकलेला दिसला".
बघता बघता साप तारावरून रहदारीच्या रस्त्यावर पडतो आणि लोक त्याला वाहनांच्या मधे शोधू लागतात. कॅप्शनमद्ये साप जमिनीवर पडल्यानंतर काय झालं हे सांगण्यात आलं. यात सांगण्यात आलं की, 'साप जमिनीवर पडल्यावर लोकांना त्याला लगेच पकडलं. त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आलं'.
लोक हा विशाल साप पाहून हैराण झाले आहेत आणि व्हिडीओवर लोक भरभरून कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'याला पाहिल्यानंतर मला सगळीकडे सापच दिसत आहेत'. दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'साप अखेर तारावर चढलाच कसा.