आई मुलाचं नात अत्यंत हृदयस्पर्शी असतं. या नात्यातील माया दर्शवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर (social media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विशेष आहे कारण यातील मुलंही विशेष आहे. त्याच्या वाढदिवशी आईनं त्याला एक गिफ्ट दिलं अन् ते पाहताच त्यानं ते आपल्या छातीशी कवटाळलं....
ट्वीटरवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ पाहुन तुमच्या डोळ्यात अक्षरश: पाणी येईल. बर्थडे साठी अख्खं घर सजलंय. या विशेष मुलानं छोटीशी टोपी घातलीय. समोर केक आहे. इतक्यात आई येते आणि त्याच्या हातात गिफ्ट देते. गिफ्टचा बॉक्स उघडण्याआधी तो तिला विचारतो आत काय आहे? नंतर तो गिफ्ट उघडतो. गिफ्ट उघडताना त्याचे हावभाव पाहुन तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तो गिफ्ट उघडतो अन् गिफ्टला मिठीच मारतो. आत एक मोबाईल फोन असतो.
हा व्हिडिओ पाहुन नेटकरी खुप भावूक झाले आहेत. एकानं तर कमेंट केलीय माझी पत्नी या विशेष मुलांच्या शाळेत शिक्षिका आहे. ती त्या शाळेत प्रत्येक क्षण प्रेमाने जगते.