Viral Video: श्रीकुट्टन बिथरला, रागात गर्दी घुसला अन् सोंडेत धरून...; पहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:58 IST2025-01-08T16:56:39+5:302025-01-08T16:58:54+5:30
Elephant Ragdolls Man: यात्रेसाठी आणलेल्या चार हत्तींपैकी एक हत्ती गर्दी घुसला आणि त्याने एका व्यक्तीला सोंडेने पकडून फिरवलं आणि लांब फेकलं.

Viral Video: श्रीकुट्टन बिथरला, रागात गर्दी घुसला अन् सोंडेत धरून...; पहा व्हिडीओ
Viral Video News: केरळातील मलप्पुरम येथील तिरुरमध्ये होणाऱ्या नेरचा उत्सवात एक दुर्घटना घडली. गर्दीला बघून हत्ती बिथरला. हत्ती गर्दीत घुसला आणि त्यानंतर त्याने एका व्यक्तीला सोंडेत पकडून फिरवलं आणि नंतर फेकून दिलं. अचानक घडलेल्या प्रकाराने लोक घाबरले आणि सैरावैरा पळत सुटले. यात २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
याहू थंगल येथील मंदिरात चार दिवस धार्मिक यात्रेचे आयोजन केले जाते, त्याला नेरचा उत्सव म्हणतात. यासाठी हत्ती आणले जातात. यावर्षीही पाच सजवलेले हत्ती आणण्यात आले होते. यात्रेत ते एका रांगेत उभे करण्यात आले होते. अचानक पक्कोथ श्रीकुट्टन नावाचा गोंगाटामुळे हत्ती बिथरला.
त्यानंतर हत्ती थेट गर्दीत घुसला. एका व्यक्तीचा पाय हत्तीने सोंडेत पकडला. त्यानंतर त्या व्यक्तीला जोरात फिरवलं. तीन चार वेळा असं केल्यानंतर हत्तीने त्या व्यक्तीला फेकून दिले. अचानक झालेल्या या प्रकाराने लोक घाबरले आणि सैरभैर पळत सुटले.
Kerala, Malappuram: A sudden elephant attack during a temple festival leaves 17 injured. One person's condition is critical.#ElephantRampage#ViralVideos#Viral#Keralapic.twitter.com/VhPQdTfW5a
— TIMES NOW (@TimesNow) January 8, 2025
चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती यावेळी निर्माण झाली. यात २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. ज्या व्यक्तीला हत्तीने सोंडेत पकडले होते, त्याला कोट्टाकल येथील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.