आता उन्हाळा सुरू होत आहे. या ऋतूमध्ये पाणी हे अमृत मानलं जातं. जेव्हा मनुष्यांना तहान लागते तेव्हा ते कसेही आपली तहान भागवतात. पण मुके पशु-प्राणी तापत्या उन्हात तडपत राहतात. काही उन्हाळ्यात घरावर किंवा घराबाहेर पाणी ठेवतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आनंद होईल.
या व्हायरल व्हिडीओत एक साप आहे ज्याला तहान लागली आहे. अशात एका व्यक्ती आपल्या हातावर पाणी घेऊन सापाची तहान भागवतो. सोशल मीडिया यूजर्स हा व्हिडीओ पाहून अवाक् झाले आहेत. लोकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये की, साप असा कसा पाणी पिऊ शकतो.
व्हिडीओत बघू शकता की, एका साप झाडावर बसलेला आहे. भीषण गरमीमुळे त्याला तहान लागली आहे. अशात एखा व्यक्तीने तिथे येतो आणि हातावर पाणी घेऊन सापाची तहान भागवतो. व्यक्ती बॉटलमधील पाणी हातावर टाकत जातो आणि साप गटागटा पाणी पितो. अनेकांना हा व्हिडीओ अवाक् करणारा आहे कारण असं त्यांनी कधी पाहिलं नाही.
४९ सेकंदाचा हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनला त्यांनी लिहिलं की, 'उन्हाळा येत आहे. पाण्याचे काही थेंब कुणाचा जीव वाचवू शकतात. तुमच्या बागेत एका भांड्यात थोडं पाणी ठेवा. कारण ते काही प्राण्यासाठी जीवन आणि मृत्यू यातील पर्याय ठरू शकतं'.