आपल्या देशात राष्ट्रगीत चालू असले की सर्वजण सावधानमध्ये जिथे असतील तिथे उभे राहतात. देशात अनेकवेळा राष्ट्रगीतावरुन वादविवादही झाले आहेत, काही दिवसापूर्वीच थिएटरमध्ये राष्ट्रगीत लावण्यावरुन गोंधळ निर्माण झाला होता. थिएटरमध्ये राष्ट्रगीतच्या नियमाला काहींनी पाठिंबा दिला होता, तर काहींनी याला विरोध केला होता. आपल्या देशातील नागरिक राष्ट्रगीताचा सन्मान मनापासून ठेवतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एका रेल्वेस्थानकावर राष्ट्रगीत वाजत असल्याचा आवाज येत आहे, यावेळी क्षणात सर्व प्रवासी जागेवर सावधानमध्ये उभे राहिल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यामध्ये रेल्वे स्टेशनच्या फलाटावर काही लोक उभे आहेत. सर्व प्रवासी ट्रेनची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. रेल्वे स्टेशनच्या शेजारी एक शाळा आहे. शाळेत सकाळच्या प्रार्थनेदरम्यान राष्ट्रगीत वाजले तेव्हा प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या सर्व प्रवासी सावधानमध्ये उभे राहिले. हा व्हिडिओ गुजरातमधील नडियाद जंक्शनचा आहे.
करिनासोबत व्यायाम करतोय तिचा छोटा मुलगा जेह.. बघा दोघांचा सुपरक्यूट व्हायरल व्हिडिओ
ट्विटरवर एका वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला.याला कॅप्शनही दिली आहे. यात 'नडियाद रेल्वे स्टेशन. जवळच्या शाळेत राष्ट्रगीताला प्रवाशांचा असा प्रतिसाद मिळाला. जय हिंद, अशी कॅप्शन दिली आहे.
हे ट्विट आणि व्हिडिओ अनेकांनी पाहिले आहे. लाखो लोकांनी ते पाहिले आहे. नेटकऱ्यांनी याला तुफान कमेंट केल्या आहेत.