Kacha Badam Song Dance Viral Video: सोशल मीडियाच्या दुनियेत आजकाल लोक 'कच्चा बदाम' (Kacha Badam) गाण्याबद्दल जोरदार चर्चा करत आहेत. छोट्या मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या गाण्यावर इंस्टाग्राम रील बनवताना दिसत आहे. गंमत म्हणजे हे गाणं कोणत्याही प्रसिद्ध गायकाने गायलेलं नाही. गावोगावी शेंगदाणा विकणाऱ्या 'भुबन बाड्याकर' (Bhuban Badyakar) नावाच्या एका शेंगदाणा विक्रेत्याने गायले आहे. मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील असणाऱ्या भुबनच्या या गाण्याला सध्या तुफान प्रसिद्धी मिळाताना दिसत आहे. नुकतेच एका बाप-लेकीने या गाण्यावर केलेला डान्स विशेष लक्ष वेधून घेत आहे. डान्स करताना ती लहान मुलगी इतकी गोड दिसतेय की तिचा डान्स पाहायला अधिकच मजा येतेय.
'कच्चा बदाम' गाण्यावर नाचतानाचा बाप-लेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भुबनचे हे गाणे केवळ भारतातच नाही तर जगभरातील लोकांना खूप आवडत आहे. परदेशातील एका बाप-लेकीच्या जोडीने या गाण्यावर आपल्या धमाल नृत्याने इंटरनेटवर मजा आणली आहे. पाब्लो आणि वेरोनिकाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट pabloeveronica01 वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही 'कच्चा बदाम' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'भारतात सुरू असलेला ट्रेंड आम्हाला आवडतोय'. पाहा तो धमाल व्हिडीओ-
दरम्यान, एका दिवसापूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडिओला ८८ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. हातगाडीवर शेंगदाणे विकणारा भुबन खूप दिवसांपासून कच्चा बदाम गाणं गातोय. नोव्हेंबरमध्ये इंटरनेटवर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अचानक हे गाणं लोकांना खूप आवडू लागलं. 'एकदा एक व्यक्ती आला आणि त्याने त्याच्या गाण्याचे कौतुक केलं तेव्हा त्याला कळलं की त्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे', असंही भुबनने सांगितलं.