कासवही मैत्री निभावतात का? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल त्याचं उत्तर देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने लिहिले की, कासवाने त्याच्या मित्र माशाचा जीव वाचवला. व्हिडीओ पाहिल्यावरही असंच काहीसं वाटतं. पण ट्विटरवरील यूजर यावरून विभागले गेलेत. प्रत्येकाची आपापली थेअरी आहे. म्हणजे कुणी म्हणतंय कासव माश्याला खाण्यासाठी आला होता आणि चुकून माश्याचा जीव वाचला. तर काहींना हा प्रकार माणूसकीचा वाटला.
हा व्हिडीओ @NaturelsLit नावाच्या यूजरने शेअर केलाय. त्याने लिहिले की, 'कासवाने त्याचा मित्र माश्याचा जीव वाचवला'. हा अनोखा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत दीड लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ५ हजारांपेक्षा लाइक्स मिळाले आहेत.
यात तुम्ही बघू शकता की, मासा दगडावर पडून आहे. अचानक पाण्यातून एक छोटा कासव येतो आणि माश्याला पाण्यात खेचून त्याला जीवनदान देतो. हा व्हिडीओ केवळ १० सेकंदाचा आहे. पण लोकांना मैत्री आणि माणूसकीचा एक उत्तम संदेश वाटतो आहे. आता खरंच कासवाने माश्याचा जीव वाचवला का? या वादात न पडता एक वेगळी गोष्ट म्हणूनही तुम्ही याकडे बघू शकता.
हे पण वाचा :
अरे देवा! छोट्या भावाला शिकवत होता ड्रायव्हिंग, पुढे जे घडलं त्याचा व्हिडीओ झाला व्हायरल...
याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान
CoronaVirus News : तंत्रज्ञानाची कमाल! आता चेहऱ्यावर मशीन लावणार मास्क, Video तुफान व्हायरल