आपण प्राण्यांवर केवळ प्रेम करू नये तर त्यांची काळजीही घ्यायला हवी. कारण ते ना बोलू शकत ना त्यांची समस्या शेअर करू शकत. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओत लोक प्राण्यांना कसा त्रास देतात बघायला मिळतं. तेच प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी इतरांपासून दर राहण्याचा प्रयत्न करतात. जिराफ एक उंच प्राणी आहे. ज्याची मानही फार लांब असते. सामान्यपणे तो जंगलातच राहतो, पण कधी कधी जंगलांच्या जवळच्या रहिवाशी भागातही जातात. जिराफ मनुष्यांवर हल्ला कधीच करत नाही. अशाच एका जिराफाची मदत काही लोकांनी केली.
जिराफासोबत एक समस्या झाली होती. त्याच्या मानेत एक टायर फसला होता. हे समजू शकलं नाही की, त्याच्या मानेत हा टायर टाकला कुणी. एक वर्षापासून हा जिराफ अनेक किलो वजनाचा टायर घेऊन फिरत होता. त्याला त्रासही होत होता. पण तो सांगू शकत नव्हता. नंतर जंगलातील टीम जिराफाच्या गळ्यातील टायर काढण्यास तयार झाली. आधी त्यांनी जिराफाला बेशुद्ध केलं आणि मग सहजपणे त्याच्या गळ्यातून टायर काढला.
जिराफच्या गळ्यातून टायर काढल्यावर त्याच्या गळ्याजवळ झालेल्या जखमांवर मलमही लावला. जसा जिराफ शुद्धीवर आला तसा तो जंगलाकडे धावत सुटता. त्याने सुटकेचा निश्वास टाकला. जंगलाकडे पळत जात असताना त्याला फार स्वतंत्र झाल्यासारखं वाटलं. व्हिडीओ पाहिल्यावर तुम्ही भावूकही होऊ शकता.
ट्विटरवर जिराफाचा हा व्हिडीओ आय़पीएस अधिकारी रूपिन शर्मा यांनी शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं की, 'जिराफचा गळ्यात एक वर्षापासून टायर अडकला होता. तो काढण्यात आला. मनुष्यांनी मनुष्यांसाठी हे केलं असतं तर किती चांगलं झालं असतं'. या व्हिडीओला ८०० पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर १२ हजारांपेक्षा जास्त या व्हिडीओला व्ह्यूज मिळाले आहेत.