कोरोना संक्रमित वाढती संख्या आणि मृतांचा वाढता आकडा पाहता अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी प्रशासनाकडून वारंवारं बजावलं जात असतानाही लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होताना दिसत नाहीये. अशा स्थितीत पोलिस नियम मोडत असलेल्यांना चांगलाच धडा शिवकत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हरियाणामधील (Haryana) अंबालात (Amabala) लॉकडाऊन असतानाही लोक सकाळी-सकाळी फिरण्यासाठी म्हणून घराबाहेर पडले. एकाचवेळी इतक्या लोकांना बाहेर पडलेलं पाहून पोलिसांना त्यांना चांगलंच धारेवर धरलं. आधी पोलिस त्यांना काही बोल्ले नाहीत. नंतर सगळ्यांना सोशल डिस्टेंसिंग पाळून लांब लाबं बसवलं आणि पार घामगळेपर्यंत व्यायाम करून घेतला. (Police Punished People Who Were Found Violating Lockdown) शेवटी पोलिसांनी शेवटची वॉर्निंग देऊन सोडून दिलं. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. (Viral Video)
बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो
वृत्तसंस्था एनएनआयनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की, पोलीस नियम तोडणाऱ्यांना उठा-बशा काढायला लावतात. लॉकडाऊन असतानाही लोक घराबाहेर जात असल्याने पोलिसांनी त्यांना शिक्षा दिली. दरम्यान हरियाणा सरकारने राज्यात 3 मे पासून एक आठवड्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली आहे.
'चल आता निघ इथून', लस घेताना पोरीची नाटकं पाहून भडकले डॉक्टर; पाहा व्हायरल व्हिडीओ
मंत्री अनिल विज यांनी ट्वीटरच्या माध्यनातून याबाबत माहिती दिली होती. यापूर्वी कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या वाढत असल्याकारणाने ग्रुरुग्राम सह हरियाणाच्या 9 जिल्ह्यात 30 एप्रिल रोजी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. हा विकेंड लॉकडाऊन शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून सोमवारी सकाळपर्यंत राहणार आहे.