जगभरात वेगवेगळे विचित्र लोक राहतात आणि त्यांचं विचित्र वागणं वेळोवेळी समोर येत राहतं. अशाच एका महिलेच्या विचित्र सवयीची सध्या सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. आयला कर्स्टन असं या महिलेचं नाव असून ती नार्वेची राहणारी आहे. १४ मे रोजी या आयलाचा एक व्हिडीओ समोर आला होता, तेव्हापासून तिची चर्चा होत आहे. आयलाचं वेगळेपण म्हणजे ती घोड्याप्रमाणे धावते, चालते. इतकेच नाही तर की घोड्याप्रमाणे उड्याही मारते. हे पाहून लोक तिचे फॅन झाले आहेत.
ट्विटरवर जे दोन व्हिडीओ समोर आले आहेत, त्यात आयला कच्च्या रस्त्यावरून धावतांना दिसत आहे. तर दुसऱ्यात ती हिरव्यागार मैदानातून धावत आहे. दोन्ही हात आणि पायांच्या मदतीने ज्याप्रकारे आयला धावत आहे, ते पाहून शंका येते की, ती खरंच मनुष्य आहे की नाही.
आयला कर्स्टनचं इन्स्टाग्रामवरही अकाऊंट असून ते तिने नुकतंच सुरू केलं आहे. त्यावर तिने केवळ ८ पोस्ट केल्या आहेत. या सर्वच व्हिडीओमध्ये ती तिचं वेगळेपण दाखवत आहे.
आयला तिच्या या वेगळेपणाबाबत सांगते की, 'मी इतकी संवेदनशील आहे की, मला प्रत्येक गोष्टीची भीती वाटते'. इंटरनेटच्या दुनियेची ती आभारी आहे. लोक तिचं भरभरून कौतुक करत आहेत.
खरंतर अशाप्रकारे घोड्याप्रमाणे धावण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची कमतरता नाहीये. यूट्यूबवर असे कितीतरी व्हिडीओ बघायला मिळतात. पण आयलाची चर्चा फारच होते आहे.