कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना वर्क फॉर्म होम करावं लागत आहे. अनेकजण वर्क फ्रॉम होमचा आनंद घेत आहेत. काहींना कधी एकदा ऑफिस सुरू होतयं असं झालंय. घरून काम करत असल्यामुळे आरामशीर बेडवर बसून काम करायचं, हवं तेव्हा खात पित काम करायचं असे प्रकार लोकांचे चालले आहे.
पण जे लोक माध्यामांसाठी ऑनस्क्रिन काम करतात. अशा कर्मचारी वर्गाला आजूबाजूची स्थिती स्वतःचा पेहराव या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण त्यांना लाईव्ह रिर्पोटिंग करायचं असतं. असाच एक व्हिडीओ समोर येत आहे. एबीसी न्यूजच्या अँकरसोबत सुद्धा एक गमतीदार प्रकार घटला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर खूप व्हायरल होत आहे. 'गुड मॉर्निंग अमेरिका' या हा कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण करत असताना हा अँकर चक्क पॅण्ट न घालताच बसला होता.
सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार २७ वर्षीय रीव आपल्या घरातून लाईव्ह प्रसारण करत होता. त्यावेळी त्यांने स्वतःच कॅमेरा सेटअप केला होता. फक्त वरचा भाग दिसेल असा कॅमेरा ठेवला होता. पण असं काहीही झालं नाही. हा अँकर पॅण्ट न घालताच बसला आहे. हे स्पष्ट कॅमेरासमोर दिसून आलं. सुरूवातीला व्हिडीओमध्ये ते संपूर्ण कोट घातलेले दिसत होते. पण नंतर या अँकरने पॅण्ट घातलेली नाही हे प्रेक्षकांना दिसून आलं. हा व्हिडीओ ट्विटरवर खूप व्हायरल होत आहे. ( हे पण वाचा-सलाम! घरची परिस्थिती बिकट, पण मनाची श्रीमंती मोठी; मुस्लिम विधवा राबतात गोरगरीबांसाठी)
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रीव यांनी सांगितलं की, त्यांनी जॅकेटच्या खाली काहीही घातलं नव्हतं. कारण लाईव्ह येण्याआधी ते वर्कआऊट करत होते. त्यांनी ट्विटरवर लिहले आहे की, 'जेव्हा वर्क फ्रॉममध्ये काहीतरी गडबड होते. तेव्हा तुम्हाला नक्कीच हसू येतं.' याआधी सुद्धा एका महिला अँकरचा वर्क फ्रॉम होमचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तेव्हा त्या अँकरचे बाबा लाईव्ह दरम्यान मागे दिसत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ( हे पण वाचा-...म्हणून 'या' देशातील डॉक्टरांना विवस्र होऊन करावा लागला निषेध)