Viral : लॉकडाऊनमध्ये चोरून करत होते लग्नाची खरेदी; शटर उघडताच पोलिसांनी चोप चोप चोपलं, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 06:09 PM2021-05-09T18:09:37+5:302021-05-09T18:13:06+5:30

Viral Video Wedding shopping : थोडेफार पैसे मिळवण्यासाठी अनेक लोक पोलिसांच्या नकळतपणे दुकानात विक्री सुरू ठेवत आहेत. 

Viral : Wedding shopping was starting in lockdown police opened the shutters and beaten up | Viral : लॉकडाऊनमध्ये चोरून करत होते लग्नाची खरेदी; शटर उघडताच पोलिसांनी चोप चोप चोपलं, पाहा व्हिडीओ

Viral : लॉकडाऊनमध्ये चोरून करत होते लग्नाची खरेदी; शटर उघडताच पोलिसांनी चोप चोप चोपलं, पाहा व्हिडीओ

Next

देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असल्यामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृतांची संख्या पाहता सरकारकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे. यादरम्यान अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. बाजारपेठा, अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पूर्णपणे बंद आहेत. तरीसुद्धा थोडेफार पैसे मिळवण्यासाठी अनेक लोक पोलिसांच्या नकळतपणे दुकानात विक्री सुरू ठेवत आहेत. 

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील दतिया या भागातील आहे. या भागात लपून-छपून शटर बंद करुन लग्नाच्या कपड्यांची खरेदी सुरू होती. पोलिसांना माहिती मिळताच त्या ठिकाणी पोहोचले.

पोलिसांनी शटर उघडलं तर दुकानातून एक तरुण व काही महिला व मुली आरडा-ओरडा करीत बाहेर पडल्या. लॉकडाऊनमध्ये दुकानं खुली करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

मात्र असं असतानाही बेकायदेशीरपणे लपून-छपून हा प्रकार सुरू  होता. त्यानंतर पोलिसांना सगळ्यांची चांगलीच शाळा घेतली. एक तरूण मात्र पोलिसांच्या विनवण्या करताना तुम्हाला दिसून येईल. पण तरीही काहीही ऐकलं नाही. पोलिसांनी त्याचा शर्ट पकडत त्याला मारलं आणि घेऊन गेले.

 सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अनेकजण लपून दुकानं उघडत असल्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकांना चांगलीच धडक भरली आहे. या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव तम्ही पाहू शकता. बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो

Web Title: Viral : Wedding shopping was starting in lockdown police opened the shutters and beaten up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.