शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Virat Kohli Reaction on Fan, Viral Video मैदानात घुसलेल्या चाहत्याला पाहून विराटने दिली भन्नाट प्रतिक्रिया, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 8:55 PM

फॅनला खांद्यावर टाकून नेलं मैदानाबाहेर; त्यावर विराटची WWE स्टाईल रिअँक्शन पाहिलीत का?

Virat Kohli Reaction on Fan, Viral Video : पहिल्याच हंगामात थेट प्ले ऑफ्समध्ये धडक मारणाऱ्या लखनौ सुपर जायंट्स संघाचा प्रवास एलिमिनेटर सामन्यात संपुष्टात आला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने बुधवारच्या सामन्यात लखनौला १४ धावांनी पराभूत केले. साखळी फेरीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला लखनौचा संघ २००हून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या लयीत होता. मात्र शेवटच्या तीन षटकांत सामना पूर्णपणे पलटला. लोकेश राहुल आणि दीपक हुड्डा दोघेही बाद झाले आणि लखनौने सामना गमावला. या सामन्यात एका चाहत्याने सुरक्षाकडे तोडले पण त्याला ज्या प्रकारे मैदानातून बाहेर नेण्यात आले त्यावरून इतरांचे चांगलेच मनोरंजन झाले.

IPL 2022 च्या एलिमिनेटर सामन्यात जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) चे क्षेत्ररक्षण चालू होते आणि सामना संपत आला होता, त्यावेळी असे काही घडले की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. इडन गार्डन्सच्या मैदानात एका चाहत्याने स्टँडवरून उडी मारून मैदानात प्रवेश केला आणि विराट कोहलीजवळ पोहोचला. त्यानंतर कोलकाता पोलीस व ग्राउंडमधील सुरक्षारक्षकही तिथे पोहोचले आणि त्यांनी त्या चाहत्याला थेट खांद्यावर टाकत मैदानाबाहेर नेले. यादरम्यान विराट कोहलीची प्रतिक्रिया जबरदस्त होती. त्या चाहत्याला पाहून विराट कोहलीला आधी आश्चर्य वाटले होते, त्यानंतर त्याने WWE स्टाईल रिअँक्शन दिली.

दरम्यान, लखनौ विरूद्धच्या सामन्यात बंगलोरने प्रथम फलंदाजी करताना २०७ धावा केल्या. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, फाफ डू प्लेसिस यांसारख्या बड्या खेळाडूंनी साफ निराशा केल्यानंतर युवा फलंदाज रजत पाटीदारने अप्रतिम फलंदाजी केली. त्याने शतक ठोकत संघाला द्विशतकी मजल मारून दिला. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना लखनौचा क्विंटन डी कॉक स्वस्तात परतला. लोकेश राहुलने अर्धशतक ठोकलं. त्याला दीपक हुड्डाने दमदार फटकेबाजी करत चांगली साथ दिली. पण अखेरीस त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. 

 

टॅग्स :IPLआयपीएल २०२२Virat Kohliविराट कोहलीRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर