मोबाइल फोन फुटल्याचे अनेक व्हिडीओ किंवा फोटो तुम्ही पाहिले असतील. पण कधी वॉशिंग मशीन फुटल्याचे ऐकले किंवा पाहिले का? अशी एक घटना स्कॉटलॅंडमध्ये घडली आहे. इथे राहणाऱ्या एका महिलेने याचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. तिने सांगितले की, तिच्या किचनमध्ये ठेवलेल्या वॉशिंग मशीनचा बॉम्बसारखा स्फोट झाला. ज्यामुळे किचन पूर्णपणे विस्कटीत झालं आहे. तिने लिहिले की, 'मी विचारली करू शकत नाही की त्यावेळी माझ्या परिवारातील कुणी किचनमध्ये असतं तर काय झालं असतं'. सोशल मीडियावर या वॉशिंग मशीनचे फोटो व्हायरल झाले आहेत.
रविवारी Laura Birrell ने फेसबुकवर तिच्या किचनचे काही फोटो शेअर केले आहेत आणि तिने लिहिले की, 'मी नेहमीच ऐकलं होतं की, जेव्हा तुम्ही घरातून बाहेर जात असाल तेव्हा वॉशिंग मशीन सुरू ठेवू नका. मी माझी वॉशिंग मशीन सुरू करून बाहेर गेली. तेव्हाच धमाका झाला. त्यामुळे घरात सगळीकडे काचा झाल्या. असं वाटत होतं की, बॉम्बचा विस्फोट झाला'.
तिने पुढे लिहिले की, 'मशीनचा ड्रम फुटला. धूर निघताना दिसला तर मी लगेच मशीन बंद केली. आता मी कधीच मशीन सुरू करून कुठे जाणार नाही. मी विचारही करू शकत नाही की, जर किचनमध्ये कुणी असतं तर काय झालं असतं'.
सोशल मीडियावरील लोक या स्फोटाचे फोटो बघून घाबरले. त्यांना विश्वास बसत नाहीये की, वॉशिंग मशीन अशाप्रकारे फुटून शकते. पण ते Laura साठी आनंदी आहे की, यात कुणाला काही इजा झाली नाही. पण वॉशिंग मशीनमध्ये स्फोट कशामुळे झाला याचं कारण अजून समोर आलेलं नाही. ही पोस्ट व्हायरल झाली आहे.