कल्पना करा की, तुम्ही कुठेतरी दूर जंगलात ट्रेकिंग किंवा हायकिंगचा आनंद घेत आहात आणि तेव्हा अचानक एक जंगली मांजर तुमचा पाठलाग करू लागते....अशात तुम्ही काय कराल? खरंतर अशा एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अमेरिकेतील Utah राज्यातील २६ वर्षीय Kyle Burgess सोबत शनिवारी ही घटना घडली. तो हायकिंगला गेला होता आणि जेव्हा डोंगरातून जात होतो तेव्हा अचानक एक मादा Cougar(बिबट्याची एक प्रजाती) त्याच्या मागे लागली होती. मग Cougar त्याला पळवण्यासाठी त्याचा मागे धावू लागली.
हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ट्विटर यूजर @RexChapman ने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, 'हा मुलगा रस्त्यावर चालत होता, ज्याचा अमेरिकन बिबट्याने ६ मिनिटांपेक्षा जास्त पाठलाग केला'. आतापर्यंत या व्हिडीओला २७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर २६ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. (बाबो! समुद्रकिनारी सापडला तब्बल १०० किलोंचा दुर्मिळ कासव, अन् मग...., पाहा फोटो)
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, हा मुलगा डोंगराळ रस्त्यावरून चालत आहे. त्याचा कॅमेरा Cougar वर आहे. Cougar त्याच्यापासून काही अंतरावरच आहे. त्याचा पाठलाग करतीय. पण मुलाने जेव्हा धावण्याचा प्रयत्न केला तेव्हा Cougar सुद्धा त्याच्या मागे धावत येत आहे. तो Cougar ला पळून जाण्यासही सांगतो आहे. काही वेळाने Cougar तिथून जातो. काही लोकांनी कमेंट केली आहे की, ती केवळ तिच्या पिल्लांची रक्षा करत होती. तर काहींनी लिहिले की, कृपया जंगलातील प्राण्यांना एकटं सोडा.