शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

VIDEO: कॅन्सरशी लढणाऱ्या लेकाला धीर देत हॉस्पिटलच्या खिडकीबाहेर नाचणाऱ्या बाबाची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 5:03 AM

कोरोनाकाळात आपलं कुटुंबच हरवून बसलेले काहीजण म्हणालेही, की ही खरी तुमची ताकद आहे, ती जपा. बाकी पैसा-संपत्ती हे तर काय, येत-जात राहील.

जिवाभावाच्या माणसाचा स्पर्श हा दुसºया माणसाला धोका वाटेल, असे दिवस येतील, हे कोरोना-पूर्व काळात कोणाला सांगितलं असतं, तर ते खरं वाटलं असतं का? - पण दुर्दैवाने आपल्यावर तशी वेळ आलेली आहे. कोरोनाने माणसांच्या जगण्यातून परस्पर विश्वासाचा स्पर्श, निखळ सहवास काढून घेतला आहे. आता उरला आहे, तो फक्त संसर्गाच्या भीतीने आणलेला सक्तीचा दुरावा... आपल्याच माणसांपासून राखावं लागणारं सुरक्षित अंतर.मात्र या अस्वस्थ काळातही काही लोक जगताना टोकाची परीक्षा देतात, त्यात त्यांच्या भावनांचाच नाही तर नात्याचाही कस लागतो, तरीही ते परस्परांसोबत राहतात. परस्परांचे हात हातात न घेताही ते एकमेकांच्या सोबत असतात. तशीच ही एका अतिशय प्रेमळ बाबाची गोष्ट. दूर अमेरिकेतल्या टेक्सासची. त्या बाबाचा एक व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट होताच अगदी अल्पावधीत ६५ लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला, अनेकांनी त्यावर आपलं मन मोकळं केलं. कोरोनाकाळात आपलं कुटुंबच हरवून बसलेले काहीजण म्हणालेही, की ही खरी तुमची ताकद आहे, ती जपा. बाकी पैसा-संपत्ती हे तर काय, येत-जात राहील.टेक्सासच्या कूक चिल्ड्रन मेडिकल सेंटरने हा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केला आहे. त्या हॉस्पिटलमध्ये १४ वर्षांचा एडन नावाचा एक मुलगा कॅन्सरवर उपचार घेतो आहे. त्याला रक्ताचा कॅन्सर आहे. कोविड महामारीची सुरुवात होती, नेमकं त्याच काळात एडनच्या या आजाराचं निदान झालं... आता त्याला उपचार करून घेण्यासाठी दवाखान्यात नियमित यावं लागतं, काही काळ राहावंही लागतं.मात्र कोरोनाकाळात दवाखान्यात रुग्णांना दाखल करणंही जिकिरीचं झालं आहे, रुग्णांना कुणी भेटायला यायची परवानगी तर नाहीच. मुलं असली, तरीही पालकांपैकीही कुणा एकालाच मुलासोबत आत येण्याची परवानगी. एडनची आई लॉरी त्याच्यासोबत दवाखान्यात येते. मात्र त्याचे वडील; च्यूक त्यांचं नाव, ते घरी बसून राहत नाहीत. तर त्या दोघांसह तेही नियमित दवाखान्यात येतात. पार्किंगमध्ये थांबून राहतात. जोवर उपचार सुरू होत नाहीत, तोवर मोठ्या खिडकीच्या खाली येऊन थांबतात. आणि आपल्या मुलाला एकटं वाटू नये, त्याचा धीर खचू नये, उदास वाटू नये म्हणून ते भर पार्किंगमध्ये चक्क नृत्य करतात. मुलगा वरून खिडकीतून पाहत असतो, बाबांकडे पाहून हात हलवतो, नाचतोही थोडासा. बापलेक दोघे हसतात आणि कॅन्सरसह जगण्याचा प्रवास हिमतीने सुरू ठेवतात.एडनची आई लॉरी स्थानिक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगते, ‘या काळात एकमेकांच्या सोबत असणं हे आम्हाला तिघांसाठीही फार महत्त्वाचं आहे. पण च्यूक आत येऊ शकत नाही, म्हणून मग त्याने हा उपाय शोधून काढला आहे. आम्ही एकमेकांसाठी जे शक्य आहे ते करतो आहोत!’एडन सांगतो, ‘मला बरं वाटावं म्हणून डॅड जर इतकं सारं करतात, तर मीही हसत हसत उपचार करवून घेतो.’ - लेकानं असं आशावादी असावं म्हणून तर च्यूकची ही सगळी धडपड चालली आहे. तो सांगतो, ‘मला माझ्या लेकाला एवढंच सांगायचं आहे की, यू आर नॉट अलोन, आपण सोबत आहोत!’- हा व्हिडिओ पोस्ट झाला, बापलेक दूरदूर राहून एकमेकांकडे पाहून डान्स करत आहेत, हे पाहून अनेकांना आॅनलाइनही भरून आलं. कोविडकाळात आपलं माणूस दूर असणं, त्याला हातही न लावता येणं, मृत्यूपश्चात चेहराही न दिसणं हे सारं जगभरातील माणसांनी अनुभवलं आहे. ‘आयसोलेशन’, ‘क्वॉरण्टाइन’ हे शब्द याच काळानं माणसांना दिले आणि एकटेपणाचा दाहही त्यातून सोसावा लागला. म्हणून हा बिनशब्दांचा व्हिडिओ.. त्यात एका बापाची लेकासाठीची माया हे सारं पाहून जगात विविध टोकांवर राहणारी माणसंही हळहळली; पण हे चित्र उमेदीचं आहे, पालकत्व आणि कुटुंब असं जपायला हवं असंही काहींनी आवर्जून लिहिलं..आता कोरोनाकाळात दमलेल्या बाबांच्या कहाण्या आपल्या अवतीभोवतीही ऐकायला-पहायला मिळतात; पण एडनचा हा बाबा वेगळा आहे. त्याची जगण्याची आणि लेकाला जगवण्याची ओढ जगण्यावरचा विश्वास वाढवणारी आहे... त्या बाबाच्या प्रयत्नाला यश येवो आणि एडन सुखरूप घरी परत येवो, एवढंच!