वाघाने अनेक लोकांवर केलेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ट्विटर यूजर @firozahm ने २४ नोव्हेंबरला शेअर केला होता. यात बघितलं जाऊ शकतं की, कशाप्रकारे लोक ओरडत वाघाचा पाठलाग करत आहे. पण वाघ अचानक पलटून त्यांच्याकडे धावत जातो. मग सगळे लोक जीव वाचवण्यासाठी इतके-तिकडे पळताना दिसत आहेत. अशात अचानक वाघ एका व्यक्तीला धरून जमिनीवर पाडतो. पण सुदैवाने वाघ त्या व्यक्तीला लगेच सोडतो आणि तेथून पसार होतो.
हा व्हिडीओ ट्विटरवर आयएफएस ऑफिसर रमेश पांडे यांनीही शेअर केलाय. त्यांनी कॅप्शनला लिहिले की, 'मनुष्यांचा पाठलाग करणं वाघाचा स्वभाव नाही. मनुष्य आणि जनावरे तेव्हाच आनंदी राहू शकतात जेव्हा त्यांच्यात एक सुरक्षित अंतर राहील. त्यामुळे जनावरांपासून दूर रहा आणि त्यांना जगू द्या'. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे.
ट्विटर यूजर @firozahm ने माहिती दिली की, त्याना हा व्हिडीओ व्हॉट्सअॅपवर आसामच्या तेजपूरहून सौरव बरकतोकी यांनी पाठवला. त्यांनी लिहिले की, 'मनुष्यांद्वारे निर्माण केलेल्या समस्या दु:खदायक आहेत. नशीबाने वाघाचा हे करण्यामागचा उद्देश केवळ आपला परिसर वाचवणं हाच होता'.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, खूपसारे लोक आरडाओरड करत इतके-तिकडे धावत आहेत. अशात वाघ वेगाने धावत येतो आणि एका व्यक्तीला धरून एका खड्ड्यात पडतो. मात्र, वाघ त्या व्यक्तीला काहीच नुकसान पोहोचवत नाही आणि तो लगेच तिथून पळून जातो. वाघाच्या हल्ल्यानंतर ती व्यक्ती उभं राहून जाताना दिसते. हा याचा पुरावा आहे की, वाघ केवळ लोकांना तेथून पळवून लावत होता.