उद्योगपती आनंद महिंद्राट्विटरवर नेहमी सक्रीय असतात. त्यांनी केलेले अनेक ट्विट व्हायरल होत असतात. कधी ते मजेदार व्हिडिओ पोस्ट करतात, तर कधी लोकांनी कष्टाने बनवलेल्या गोष्टींचे असतात.
अलीकडेच महिंद्रा यांनी अभिनेता-लेखक आशुतोष राणा यांची 'तब बचपन याद आता है' ही कविता वाचतानाचा एक मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट राणा यांनी रिट्विट केले आहे. "माझे कौतुक केल्याबद्दल आणि मला तुमच्या सोशल मीडियावर स्थान दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री आनंद महिंद्रा जी... शुभेच्छा, असं यात ट्विटमध्ये म्हटले आहे.
आनंद महिंद्रा यांनी मंगळवारी, १६ नोव्हेंबर रोजी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला. "बालपणीचा निरागसपणा आपल्याला त्या अद्भुत वेळेची किंमत समजण्यापासून रोखतो… असी कॅप्शन आहे, या व्हिडिओला ७ लाख ६८ हजार व्ह्यूज, २८.५ हजार लाईक्स आणि ४.६ हजार रिट्विट्स मिळाले आहेत. यासोबतच शेकडो यूजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट केल्या आहेत. "बालपणीचे ते दिवसही काय दिवस होते, अशी एका युझरने कमेंट केली आहे.
५८ सेकंदाच्या क्लिपमध्ये अभिनेता आशुतोष राणा त्याची 'तब बचपन याद आता है' ही कविता वाचताना दिसत आहेत. ते म्हणतात- जेव्हा आपल्याला रडता येत नाही, सुखाने झोप येत नाही, हरवता येत नाही तेव्हा बालपण आठवते... जेव्हा काळजी त्रास देते, शरीर खाते, जेव्हा मन सापडत नाही तेव्हा बालपण आठवते. ती येते... जेव्हा आपण तुटतो, जेव्हा आपल्याला स्वतःचा राग येतो, जेव्हा स्वप्न आपल्याला सतावतात तेव्हा आपल्याला बालपण आठवते... आपण मुले राहू शकत नाही, आपण मोठे होऊ शकत नाही, आपण उभे देखील राहू शकत नाही. अजूनही बालपण आठवतं. मन भेटत नाही, मग बालपण आठवते…, असं या कवितेत म्हटले आहे.