देशातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या मजूरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे उपासमारीमुळे कर्मभूमीत मरण्यापेक्षा अनेक मजूरांनी जन्मभूमीत परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जथ्येच्या जथ्ये गावी परतताना दिसत होते. अनेकांनी मिळेत त्या वाहनानं किंवा पायी जाण्याचा निर्णय घेतला. भारतीय रेल्वेनंही श्रमिक ट्रेन सोडून मजूरांना त्यांच्या गावी सोडण्याची सोय केली आहे. काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथून काही मजूर मिझोरामच्या दिशेनं याच श्रमिक ट्रेनमधून गेले. बंगळुरू ते मिझोराम या प्रवासात भारत देश का महान आहे, याची प्रचिती आली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून आपल्या देशाची महानता कळते.
देशात कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 91,041इतकी झाली आहे. त्यापैकी 91,907 रुग्ण बरे झाले असून 5413 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात देशाला चक्रीवादळाचाही फटका बसला. कोलकाता, आसाम येथे या चक्रिवादळाचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे बंगळुरूवरून मिझोरामच्या दिशेनं निघालेली ट्रेन आसामला पोहोचली तेव्हा तेथील पूरपरिस्थिती पाहून मजूरांच्या डोळ्यात पाणी आणलं.
तेव्हा गाडीतील मजूरांनी त्यांच्या जवळ असलेल्या मोजक्याच अन्नापैकी काही अन्न आसाममधील रेल्वे रुळावरील लोकांना वाटलं. श्रमिक ट्रेनने प्रवास करणाऱ्या मजूर अन्नाचे पॅकेट्स आसाममधील कोनांना वाटत होते. माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या या व्हिडीओनं सर्वांची मनं जिंकली. मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनीही तो व्हिडीओ स्वतःच्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर केला.
पाहा व्हिडीओ...
पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
WWE स्टार खेळाडूनं घेतला जगाचा निरोप; दोन महिन्यांपूर्वी झालेलं पत्नीच निधन
नताशाच्या 'बेबी शॉवर'ला हार्दिक पांड्याची फुल्ल टू धमाल; फोटो व्हायरल
हार्दिक-नताशा यांनी Good News दिली, विरुष्काची डोकेदुखी वाढली; पाहा भन्नाट मीम्स!
विराट कोहलीला घाबरत नाही; पाकिस्तानच्या 17 वर्षीय गोलंदाजानं दिलं चॅलेंज
Video : युवराज सिंगच्या 'किचन 100' चॅलेंजला सचिन तेंडुलकरचं दमदार उत्तर
Shocking : भारताच्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजाचे रस्ता अपघातात निधन
लॉकडाऊनमध्ये घरी जाण्यासाठी त्यानं चोरली बाईक; त्यानंतर जे केलं ते भारीच होतं!