एका लहान मुलाचा जीव वाचवल्यानंतर इंटरनेटवर एका सफाई कर्मचाऱ्यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे आणि ट्विटर यूजर रेक्स चॅपमॅनने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मुलाचा जीव वाचवतानाचं हे व्हिडीओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार ही घटना ब्राझीलच्या रोलॅंडियामध्ये घडली. झालं असं की, मुलाच्या आजोबाने चुकून घराचं गेट उघडं ठेवलं होतं. व्हिडीओत दिसणारा लहान मुलगा लुकस गेटमधून धावत बाहेर गेला आणि एका कचऱ्याचा ट्रक तेथून पास होण्याची वाट बघत होता. जेणेकरून त्याला रस्ता पार करता यावा.
जसा कचऱ्याचा ट्रक त्याच्या समोरून गेला लुकस रस्ता पार करण्यासाठी धावला. पण रस्त्याच्या उजवीकडून येणाऱ्या कारला बघू शकला नाही. सफाई कर्मचाऱ्याने लुकसला रस्ता पार करताना पाहिलं आणि वेळीच मुलाला पकडलं. सफाई कर्मचाऱ्याच्या समजदारीने मुलाचा जीव वाचला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली.
रेक्स चॅपमॅनने आपल्या पोस्ट केलेल्या छोट्या क्लिपला आतापर्यंत १ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. आणि ६० हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये सफाई कर्मचाऱ्याला लोक एखाद्या हिरोप्रमाणे सन्मानित करत आहेत. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.