लॅंडस्लाइडचा एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. लॅंडस्लाइडमध्ये एका दुचाकीस्वारासोबत जे होतं ते पाहून अंगावर शहारा तर येतोच, सोबत असं वाटतं यम हा समोरच बसला आहे. लॅंडस्लाइडचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण हा व्हिडीओ जास्त धडकी भरवणारा आहे.
आयएफएस ऑफिसर परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, 'हा दुचाकीस्वार लकी आहे. तुम्हाला माहीत आहे का की, अशाप्रकारचे लॅंडस्लाइड का होतात. बघा कशाप्रकारे झाडांची एक लाइन नष्ट झाली. झाडांची उपयोगिता दर्शवण्यासाठी हा बेस्ट व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ इंडोनेशियातील आहे'.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे एका रस्त्यावर लॅंडस्लाइड होत आहे. दरम्यान लोकही बाइकने ये-जा करत आहेत. एक बाइकवाला तेथून जाताना लॅंडस्लाइड होते आणि तो वेळेवर कट मारतो. आणि तो बचावतो.
या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. लोक लॅंडस्लाइड का होतं हेही समजावून सांगत आहेत. एकाने सांगितले की, झाडे तोडल्याने लॅंड स्लाइड होण्याचा धोका अधिक राहतो. झाडे मातीला पकडून असतात. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून याला १४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
हे तर समजायलाच हवं की, दिवसेंदिवस झाडांची कत्तल होत आहे. हे चित्र मनुष्यासाठी नवी धोके निर्माण करणारं आहे. जेव्हा जेव्हा मनुष्य निसर्गाचं नुकसान करत राहणार तेव्हा तेव्हा लॅंडस्लाइडसारख्या घटना घडत राहणार.
Viral Video : जंगलात फिरत होत्या तीन तरूणी, अचानक त्यांच्याजवळ आलं अस्वल आणि....