दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत आहेत. सोबत प्रदूषणही वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही वापर वाढत आहे. म्हणजे विजेवर चालणाऱ्या कार-बाइकचा वापर. सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने सायकलची मोटर बाइक तयार केली आहे. त्याचाच हा व्हिडीओ.
महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी लिहिले की, 'आम्ही इकडे ई-बाइकवर काम करत आहोत आणि या व्यक्तीने त्याच्या टू-व्हीलरसाठी एक आयडिया शोधून काढली आहे. पाहून असं वाटतं की, हा जुगाड फक्त भारतीयांसाठीच नाहीये. मला विश्वास द्यायचा आहे की, मी हा जुगाड कॉपी करणार नाही'.
या व्हिडीओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, एका व्यक्तीने त्याच्या पाठीवर मोटर असलेला पंखा लावला आहे. हातात अॅक्सेलेटर आहे. ते दाबलं की, मोटर आणि पंखा वेगाने फिरतो. सायकलला बॅलन्स केल्यावर ही व्यक्ती अॅक्सेलेटर प्रेस करतो ज्यामुळे पंखा वेगाने फिरु लागतो. त्यातून निघणारी हवा त्याला पुढे ढकलते आणि सायकल मोटर बाइकच्या वेगाने पुढे सरकते. खरंच ही आयडिया कमाल आहे.