शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
2
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
3
Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी
4
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
5
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
6
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
7
...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."
8
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
9
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
10
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
11
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
12
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
13
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
14
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान
15
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
16
UPI Payment : फोनमध्ये इंटरनेट नाहीये? टेन्शन कसलं! पाहा विना इंटरनेट कसं करू शकता UPI Payment
17
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
18
Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!
19
तनुश्री दत्ता गेल्या सहा वर्षांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, "Me Too मधील आरोपींनीच..."
20
स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

Viral Video: अमेरिकेत आढळला एलियन; CCTV कॅमेऱ्यात दिसला विचित्र प्राणी, पाहा चकीत करणारा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 6:45 PM

Viral Video: आतापर्यंत एलियन दिसल्याचे दावे अनेक देशातील लोकांनी केले आहेत. आता अमेरिकेत एलियन दिसल्याचा दावा करण्यात येतोय.

वॉशिंग्टन: आतापर्यंत एलियन दिसल्याचे दावे अनेक देशातील लोकांनी केले आहेत. या दाव्यांमध्ये अमेरिका सर्वात पुढे आहे. आता परत एकदा अमेरिकेत एलियन दिसल्याचा दावा करण्यात येतोय. अमेरिकेतील केंटकी येथील एका घराबाहेर बसवण्यात आलेल्या सुरक्षा कॅमेऱ्यात एक विचित्र प्राणी कैद झाला आहे. 

घरमालकाने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर एकच गोंधळ उडाला. व्हिडिओमध्ये घराबाहेर सामान्य प्राण्यांपेक्षा एक विचित्र प्राणी दिसतोय. हा काही लोक त्याला एलियन म्हणत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारा हा प्राणी कोणता आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. काही लोकांनी या व्हिडिओच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

व्हिडिओमध्ये काय दिसलेParanormality मासिकाने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक भितीदायक दिसणारा प्राणी मोरेहेड, केंटकी येथील रस्त्यावरून चालताना दिसत आहे. हा प्राणी वाकून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. व्हिडिओमध्ये या प्राण्याभोवती उभ्या असलेल्या गाड्याही स्पष्ट दिसत आहेत. मात्र, हा प्राणी वाहनांजवळ जाण्याऐवजी जमिनीवर पडलेल्या वस्तूचा शोध घेत असल्याचे दिसून येत आहे. रात्रीची ही घटना सुरक्षा कॅमेऱ्यात कैद झाली.

हा व्हिडिओ 6 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहेParanormality Magazine ने शेअर केलेला व्हिडिओ 6 लाख 35 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही लोकांचा दावा आहे की, तो एलियन असू शकतो, तर काहींनी तो व्हिडिओ फसवा असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल