पश्चिम बंगाल आणि ओडिसात बुधवारी चक्रीवादळाने थैमान घातले आहे. अम्फान असे या चक्रीवादळाचे नाव असून दोन्ही राज्यात मिळून जवळपास ७० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर, नैसर्गिक साधनसंपत्तीचेही नुकसान झाले आहे. या चक्रीवादळाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. असाच एक माणूसकीचे दर्शन घडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या दोन माणसांबद्दल नक्कीच अभिमान वाटेल.
या चक्रिवादळात माणसांप्रमाणेच दिवसरात्र निर्सगाच्या सानिध्यात असलेल्या मुक्या जनावरांचे सुद्धा हाल झाले आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, खाली संपूर्ण पाण्याने तुडुंब भरलेला रस्ता आहे. हा कुत्रा खिडकीवर आपला जीव मुठीत घेऊन बसला आहे. या दोन माणसांनी कुत्र्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले प्रयत्न तुम्ही पाहू शकता. दोघांनी मिळून कुत्र्याला त्या जागेवरून बाहेर काढलं आहे. सोशल मीडीयावर या व्हिडीओवर कंमेट्सचा वर्षाव होत आहे.
हा व्हिडीओ ट्विटरवर इशिता यादव यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ७० हजारांपेक्षा जास्त व्हिव्ज् आहेत. कुत्र्याला आपल्याकडेवर उचलून हा माणून घेऊन जाताना दिसून येत आहे. दोघांनीही आपल्या तोंडाला मास्क लावले आहेत. ज्या माणसांनी या कुत्र्याला वाचवलं याचं सोशल मीडीयावर कौतुक होत आहे.
...म्हणे 'इथे' बकऱ्यांच्या विष्ठेने लाखो रुपये कमावतात; कसा होतो बकऱ्यांचा मालक लखपती?
बाबो... लॉकडाऊनमध्येही 'कडकनाथ' कोंबड्यांची लूट; सीसीटीव्हीत चोरटे झाले शूट