कासव हा सर्वात जास्त जगणारा जीव आहे तुम्हाला माहीत असेलच. तुम्ही वेगवेगळ्या प्रजातींचे कासव कुठे ना कुठे पाहिले असतीलच. पण सामान्यपणे सर्वांचा रंग सारखाच असतो. पण तुम्ही कधी पिवळ्या रंगाचा कासव पाहिलाय का? नाही ना...मात्र आज आम्ही तुम्हाला हा दुर्मिळ पिवळ्या रंगाचा कासव दाखवणार आहोत.
आयएफएस ऑफिसर सुशांता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनला लिहिले की, 'ओडिशातील बालासोरमध्ये एक दुर्मिळ पिवळा कासव आढळून आला'. असे मानले जात आहे की, हा कासव सूर्याच्या रंगासारखा आहे.
एका ट्विटर यूजरने या कासवाबाबत माहिती दिली. याला Albino Indian Flapshell असं म्हटलं जातं. १० हजार कावसांमध्ये एखाद असा असतो. जंगलात यांची वाचण्याची संधी कमी असते. हे भारतात अनेक ठिकाणी आढळतात. या दुर्मिळ कासवाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकही याला पाहून अवाक् झाले आहेत.
दरम्यान याआधी मध्य प्रदेशातील उजैनमध्ये एक काळी पाठ असलेला आणि १८ नखे असलेला दुर्मिळ कासव सापडला होता. हा कासव लकी मानला जातो. एका उद्योगपतीला हा कासव पावसात वाहून आल्यावर सापडला होता. तो त्यांनी वन विभागाकडे सोपवला होता. आता या पिवळ्या कासवाचा व्हिडीओ व्हायरल झाला.
Viral Video : जंगलात फिरत होत्या तीन तरूणी, अचानक त्यांच्याजवळ आलं अस्वल आणि....
Video : झाडावर इतका लांब साप चढताना पाहून लोकांना आठवला Anaconda, तुम्ही कधी पाहिला का?