Anand Mahindra Post : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहेत. ते त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर (आता X) नेहमी प्रेरणादायी किंवा मनोरंजक पोस्ट शेअर करत असतात. सोशल मीडियावर त्यांची फॉलोइंग मोठी आहे, त्यामुळे त्यांच्या सर्वच पोस्ट प्रचंड व्हायरल होतात. आता त्यांनी आपल्या नवीन पोस्टमधून पाण्याबाबत जागरुकता निर्माण केली आहे.
वातावरणातील बदलांसह विविध कारणांमुळे भारतातील बहुतांश ठिकाणी पाण्याचे मोठे संकट उभा राहिले आहे. त्यातच आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे ही पाणी टंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अशातच आनंद महिंद्रा यांनी आपल्या या नवीन पोस्टमधून पाण्याचा योग्य वापर कसा करावा, याबाबत संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला देसी जुगाड सर्वांसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. एसीमधून बाहेर पडणारे पाणी वाया जाण्यापासून कसे वाचवता येते, हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
व्हिडिओ पाहा:-
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर करत पाणी हीच खरी संपत्ती असल्याचे म्हटले आहे. एका छोट्याशा युक्तीने पाणी वाया जाण्यापासून कसे वाचवता येते, हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. एसीमधून बाहेर पडणारे पाणी साठवून त्याचा हात-पाय धुणे, फरशी पुसणे, बागकाम किंवा इतर काही कामांसाठी वापर केला जाऊ शकतो. ज्यांच्या घरात एसी आहे, त्यांच्यासाठी हा देसी जुगाड नक्कीच फायदेशीर ठरेल. 1 मिनिट 22 सेकंदांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.