गोलगप्पा, पाणीपुरी, फुचका किंवा बताशे, हा एक असा लोकप्रिय इंडियन स्ट्रीट स्नॅक आहे, जो भारतातील बहुतांश लोकांना खायला आवडतो. लहान मुले असोत वा वृद्ध, पाणीपुरी पाहिल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. विविध राज्यात याचे नाव वेगवेगळे आहे, पण खाण्याची पद्धत एकच आहे. पुरीमध्ये उकडलेले बटाटे आणि हरभरे टाकून आंबट-तिखट पाण्यासोबत दिले जाते. पण, सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही कपाळावर हात मारुन घ्याल.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाणीपुरीवाला बटाट्याऐवजी चक्क केळीचे मिश्रण पाणीपुरीत टाकताना दिसत आहे. पाणीपुरीमध्ये उकडलेल्या बटाट्यांना स्मॅश करुन टाकले जाते आणि त्यात हरभरे आणि पाणी टाकून दिले जाते. पण या व्हिडिओत तो चक्क केळी स्मॅश करुन पुरीत भरतो आणि ग्राहकांना देतो. ग्राहकदेखील त्याची ही अनोखी पाणीपुरी आवडीने खाताना दिसत आहेत.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही पाणीपुरी नेमकी कुठे दिली जाते. तर, ही पाणीपुरी गुजरातमध्ये दिली जाते. ट्विटर हँडल @MFuturewala वरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत मार्केटमध्ये ‘केळी चना पाणीपुरी’ आली आहे, असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही कपाळावर हात मारल्याशिवाय राहणार नाहीत.