(Image Credit- Facebook, Rilway Children india)
कोरोनाने देशभरातील जवळपास सगळ्याच राज्यात कहर केला आहे. या भयानक साथीच्या परिणामाचा मानवी आरोग्यावर तसेच नातेसंबंध आणि माणुसकीवर खूप परिणाम झाला आहे. अशी प्रकरणे सतत समोर येत आहेत, ज्यामध्ये कोरोनामुळे लोकांना त्यांचे नातेवाईक सोडून जात आहेत
अशा स्थितीत आता कोलकात्यातून असाच प्रकार समोर आला आहे. येथे एका लहान मुलाला कोरोना संसर्ग झाला आणि वडील त्याला स्टेशनवर सोडून निघून गेले. समोर आलेल्या माहितीनुसार कोलकाताच्या सियालदह रेल्वे स्टेशनवर १४ वर्षांचा मुलगा रडताना दिसून आला.
नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं
या मुलाकडे कोरोना संक्रमित असल्याचा रिपोर्टही होता. पोलिसांनी याबाबत माहिती मिळताच रेस्क्यू करून चाईल्ड लाईनकडे या मुलाला सुपूर्त केलं. काही तासांच्या तपासणीनंतर लहान मुलाला त्याच्या नातेवाईकांकडे पोहोचवलं.
माणुसकीला सलाम! आई वडिलांना कोरोना संसर्ग; महिला पोलिसानं ६ महिन्यांच्या बाळाचा केला सांभाळ
आता या मुलाची स्थिती बरी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येताच वडील घाबरले होते. त्यानंतर ते आपल्या मुलाला बेवारस अवस्थेत स्टेशनला सोडून पळून गेले. पोलिसांनी सदर घटनेतील वडीलांची समजूत काढली आणि मुलाला त्यांच्या हवाली केले.
महिला पोलिसानं ६ महिन्यांच्या बाळाचा केला सांभाळ
दिल्लीत राहणाऱ्या एका दांपत्याला कोरोनाची लागण झाली. त्यांचं एक सहा महिन्यांचं बाळही होतं. परंतु त्या बाळाची काळजी घेणारं कोणीही नव्हतं. अशा परिस्थितीत एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं पुढाकार घेत त्या बाळाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत राहणाऱ्या या दांपत्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला होता. परंतु त्या बाळाचा अहवाला नकारात्मक आला. इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार त्यांनी यानंतर दिल्ली पोलिसांना फोन केला आणि मदती करण्याची विनंती केली. दिल्लीत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आपले नातेवाईक येऊ शकत नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यांना आपल्या बाळाला कोरोनाची लागण होऊ नये याची चिंता होती.
शाहदरा जिल्ह्यात तैनात असलेलय्या महिला हेड कॉन्स्टेबल राखी यांना याबाबत माहिती मिळाली. यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी त्या दांपत्याशी संपर्क केला आणि बाळाला आपल्यासोबत घेऊन आल्या. पोलीस कर्मचारी राखी यांनी बाळाचे कपडे, खाणं आणि अन्य आवश्यक वस्तू आपल्यासोबत घेतल्या. तसंच त्यांनी त्या बाळाची काळजीही घेतली. त्यांनी त्या बाळाला अगदी आईप्रमाणे खाऊ-पिऊही दिलं. त्यानंतर त्या बाळाला सुरक्षितपणे आजीआजोबांकडे मोदीनगर या ठिकाणी पोहोचवलं.