चमत्कारच म्हणावं लागेल अशी एक घटना नेदरलॅंडच्या रॉटरडॅम शहरात घडली आहे. एका मेट्रोचा मोठा अपघात इथे सुदैवाने टळला आहे. या धक्कादायक घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जे पाहून तुम्हाला मरणाच्या दारातून परतणं कशाला म्हणतात हे समजेल. हे रॉटरडॅम शहरातील मेट्रोचं शेवटचं स्टेशन होतं. हे स्टेशन पाण्यावर बांधलं आहे. जिथे हे स्टेशन संपतं तिथे इंजिनिअरने सुंदरतेसाठी एक 'व्हेल' शेपटी तयार केली होती. ज्यातील एका शेपटीमुळे मेट्रो जमिनीवर पडण्यापासून वाचली.
जेव्हा या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना आणि बचाव दलाला मिळाली तेव्हा ते लगेच मदतीसाठी पोहोचले. यादरम्यान एका फोटोग्राफर, ब्लॉगर Joey Bremer हेही पोहोचले. त्यांनी काही या अपघाताचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर शेअर केलेत. ही मेट्रो जमिनीपासून १० मीटर वर हवेत लटकली होती. या अपघातात मेट्रोचं आतून नुकसान जाल आहे. खिडक्याही तुटल्या आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना सोमवारी पहाटे घडली. सुदैवाने यावेळी मेट्रोमध्ये एकही प्रवासी नव्हता. मेट्रो शेवटच्या स्टेशनवर थांबलीच नाही आणि ट्रॅकवरून बाहेर निघाली. पुढे येऊन मेट्रो व्हेलच्या शेपटीवर येऊन अडकली. कथितपणे ड्रायव्हर स्वत:च ट्रेनमधून बाहेर आला. त्याला या अपघातात काही झालं नाही.
असे सांगितले जात आहे की, व्हेलची शेपटी पॉलिस्टरपासून तयार केली आहे. ही डच आर्किटेक्ट Maarten Strujs ने डिझाइन केली होती. २००२ मध्ये मेट्रो स्टेशनच्या शेवटी हे शेपटी लावली होती. ही शेपटी केवळ सौंदर्यीकरणासाठी लावण्यात आली होती. या अपघाताची चौकशी केली जात आहे.