मागील वर्षी इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या किकी चॅलेंजने सर्वांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. अशीच अनेक चॅलेंज इंटरनेटवर व्हायरल होत असतात. या नव्या वर्षात असचं एक चॅलेंज व्हायरल होत आहे ते म्हणजे, #10YearChallenge. सध्या नेटकऱ्यांमध्ये याच चॅलेंजची चर्चा असून इतरही अनेक लोकं या चॅलेंजला सीरियसली घेत आहेत. आता तुम्ही गोंधळला असाल की, हे चॅलेंज नक्की आहे तरी काय? हे चॅलेंज अगदी सोपं आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आपला 10 वर्षांपूर्वीचा फोटो आपल्या सध्याच्या फोटोसोबत कोलाज करून शेअर करायचा. तुमच्यापैकी अनेक जणांनी देखील या चॅलेंजमध्ये भाग घेतला असेलच. पण तुम्हाला माहीती आहे का? या आगळ्यावेगळ्या चॅलेंजची खरी सुरुवात कुठून झाली? खरं तर सोशल मीडियावर या चॅलेंजची अनेकांनी खिल्ली उडवलेली पाहायला मिळते. इतकचं नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही या चॅलेंजपासून स्वतःला दूर ठेवू शकलेले नाहीत. पाहूयात सोशल मिडीयावर या चॅलेंजच्या व्हायरल होणारे मिम्स...
आपले दिवस तर 10 वर्षांनंतरही तसेच आहेत...
या 10 वर्षांमध्ये असचं झालं...
अब बच्चा कर लो....
दादा काही बदलले नाहीत...
असा दिसतो आता हा मुलगा...
याच्याशी बंटीचा काय संबंध?
राहुल गांधी तर...
10 वर्षांनंतरही...
कशी सुरुवात झाली या चॅलेंजला?
#10YearChallenge या नावाने सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या चॅलेंजला #HowHardDidAgingHitYou या नावानेही ओळखलं जातं. या चॅलेंज अतंर्गत लोक आपल्या 2007 पासून ते 2009 पर्यंतच्या फोटांना 2019मधील फोटोसोबत कोलाज करून शेअर करत आहेत. हे चॅलेंज कोणी सुरू केले याबाबत अद्याप तरी कोणतीही माहीती उपलब्ध नाही. परंतु असं मानलं जातं की, ज्यावेळी लोकांनी आपल्या आठवणी या 10YearChallenge मार्फत शेअर करण्यास सुरुवात केली त्यावेळी हे चॅलेंज नेटकऱ्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही पॉप्युलर झालं.