(Image Credit : pan nu wa)
सोशल मीडियाच्या या मायाजाळात कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काहीच नेम नाही. हे कुणी सांगूही शकत नाही. ट्विटरवर सध्या असाच एक वादविवाद सुरू आहे की, महिला बाथटबमध्ये काय-काय करतात? यावर वाद-विवादापेक्षा अधिक गंमत अधिक केली जात आहे. गंमत महिलांची नाही तर फर्निचर कंपनीची केली जात आहे. या कंपनीने बाथटब ट्रे ची जाहिरात दिली आहे. नेमकं प्रकरण काय आहे हे समजून घेऊया....
कंपनीने शेअर केलेली हीच ती जाहिरात आहे. आणि यावरूनच लांबलचक चर्चेला सुरूवात झाली. या फोटोत एक महिला बाथटबमध्ये बसली आहे आणि हसत आहे. तिच्यासमोर एक बाथटब सुद्धा आहे. ज्यात वाइनचा ग्लास ठेवला आहे. मोबाइल फोन आणि कॉस्मेटिकही आहे.
बस मग काय यावरून चर्चेचा चांगलंच उधाण आलं. एका @doodlyroses नावाच्या महिलेने हा फोटो शेअर करत लिहिले की, 'बाथटब ट्रे तयार करणाऱ्या या कंपनीला कदाचित हे माहीत नसावं की, महिला बाथटबमध्ये खरंच काय करतात. याने मला वेगळच वाटत आहे'. हे ट्विट हजारो लोकांनी रिट्विट केलं आणि पाहता पाहता मजेदार ट्विट्स समोर आले.
एक दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'थांबा, महिला बाथटबमध्ये काय करतात? म्हणजे मी आतापर्यंत जे करत होते ते चुकीचं होतं का? यूजरने आणखी एक फोटो शेअर केला. ज्यात महिला बाथटबमध्ये बसलेली आहे. समोर तसाच ट्रे आणि त्यात दोन आयफोन, एक आयपॅड आणि दोन प्रकारची वाइन ठेवली आहे.
आता कशाला कुणी गप्प बसणार? यानंतर आणखी काही फोटो शेअर करण्यात आले. या फोटोत बाथटब ट्रेमध्ये नेल पॉलिश, मेणबत्ती, कॉर्नफ्लेक्स आणि इलेक्ट्रिक ब्लू कॉकटेलसोबत आयपॅडही आहे. ज्यावर नॅशनल जिओग्राफी चॅनलवर काहीतरी सुरू आहे.एक यूजर तर म्हणाली की, या ट्रे ची गरज आहे तरी कुणाला? एकीने विचारलं की, तिला बाथटबऐवजी शॉवर घ्यायला आवडतं. मग ती तशा स्थितीत वाइन घेऊ शकते.
असो, या ट्रेवरून सध्या चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. हा ट्रे जॉर्जियाच्या कंपनीने तयार केला आहे. तशी या बाथटबची किंमत भारतीय करन्सीनुसार २ हजार रूपये ते ३ हजार रूपये दरम्यान असू शकते.