सोशल मीडियावर आपण सर्वजण अॅक्टिव्ह असतो. मात्र सध्या X म्हणजेच ट्विटरवर आता Click Here चा एक नवा ट्रेंड आलेला पाहायला मिळत आहे. इंटरनेटवर हा ट्रेंड तुफान व्हायरल होत असून राजकीय पक्ष, लोकप्रिय व्यक्ती, नेते मंडळीसह सर्वसामान्य व्यक्तीही तो फ़ॉलो करताना दिसत आहे. Click Here म्हणत पोस्ट करत आहेत. पण Click Here चा हा ट्रेंड नेमका आहे काय आणि याचा कसा वापर करायचा याबाबत जाणून घेऊया...
Click Here च्या पोस्टमध्ये युजर्सना एका पांढऱ्या बॅकग्राऊंडवर काळ्या रंगात Click Here लिहिलेलं दिसतं. या मजकुरासोबत खालच्या दिशेला एक अॅरो आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर Click Here च्या अनेक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहेत. ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
ALT मध्ये मिळेल डिस्क्रिप्शन
Click Here मधील अॅरो चिन्हाच्या खाली लहान अक्षरात ALT लिहिलेलं आहे. जेव्हा आपण या ALT वर क्लिक करतो, तेव्हा त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, युजर्स 1000 कॅरेक्टरपर्यंत मेसेज लिहू शकतात. कंपनीने ट्विटरवर हे फिचर आधीच जारी केलं आहे.
ALT टेक्स्ट म्हणजे नेमकं काय?
X नुसार, जेव्हा तुम्ही या प्लॅटफॉर्मवर एखादी इमेज शेअर करता तेव्हा तुमच्याकडे एक ऑप्शन असतो. तुम्ही त्याच्यासोबत एक डिस्क्रिप्शनअॅड करू शकता. याच डिस्क्रिप्शनला ALT टेक्स्ट असं म्हटलं जातं. ALT टेक्स्ट हे प्रामुख्याने फोटो ओळखण्यासाठी दृष्टीहीन आणि कमी दिसणाऱ्या लोकांना मदत करतं. फोटो नेमक्या कोणत्या विषयाशी संबंधित आहेत याची माहिती ALT टेक्स्टच्या मदतीने दिली जाते.
2016 मध्ये ट्विटरने ALT टेक्स्ट फीचर लाँच केलं. त्यावेळी या फीचरबाबत आम्हाला जास्तीत जास्त युजर्सपर्यंत कंटेंट पोहोचवायचा आहे असं सांगितलं होतं. आजकाल हे फीचर Click Here च्या इमेजसह व्हायरल होत आहे.
X वर अशी पोस्ट करण्यासाठी, युजर्सना एक नवीन पोस्ट तयार करावी लागेल. यानंतर, युजर्सना Click Here नावाची इमेज अटॅच करावी लागेल आणि नंतर Add description वर जावे लागेल. यानंतर, जेव्हा तुम्ही पोस्ट करता तेव्हा तुम्हाला फोटोच्या खाली ALT दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही डिस्क्रिप्शन लिहू शकता.