लग्न म्हणजे काय? या विषयावर एका विद्यार्थ्याने निबंध लिहिला आणि त्याचा 'टेस्ट पेपर' इंटरनेटवर व्हायरल झाला. हा फोटो, ट्विटर यूजर @srpdaa ने शेअर केला आहे. त्यांनी इमोजीसह कॅप्शन देत लिहिले, लग्न म्हणजे काय? हे या 'टेस्ट कॉपी' मध्ये बघितले जाऊ शकते. एका वद्यार्थ्याने लग्न म्हणजे काय? या विषयावर निबंध लिहिला आहे. जो शक्षकाला बरोबर वाटला नाही आणि त्यांनी या निबंधावर लाल पेनाने फुली मारत त्या विद्यार्थ्याला 10 पैकी 0 मार्क दिले. एवढेच नाही, तर त्यांनी इंग्रजित नॉनसेंस आणि मला येऊन भेट असेही लिहिले आहे.
लग्न म्हणजे काय? -या प्रश्नाच्या उत्तरात विद्यार्थ्याने लिहिले, जेव्हा मुलीचे आई-वडील तिला सांगतात की, तू आता मोठी झाली आहेस. तेव्हा, आता आम्ही तुला खाऊ घालू शकत नाही. त्यामुळे तू एक अशी व्यक्ती शोध जी तुझे पोट भरू शकेल. यानंतर ती मुलगी एका व्यक्तीला भेटते, ज्याचे आई-वडील त्याच्यावर लग्न करण्यासाठी ओरडत असतात. तसेच, आता तू मोठा झाला आहेस, असे म्हणत असतात. यानंतर दोघेही एकमेकांना समजून घेतात आणि आनंदी होतात. यानंतर ते सोबत राहायला सुरुवात करतात आणि मग मुलांसाठी 'नॉनसेंस' करतात.
कुणी तरी या मुलाला मेडल द्या -हा निबंध सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हे ट्विट आतापर्यंत पंधरा हजारहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. तसेच 2.5 हजार हून अधिक लोकांनी रीट्वीट केले आहे. याच बरोबर अेक जण यावर प्रितिक्रियाही देत आहेत. येथे अधिकांश लोकांनी या विद्यार्थ्याला 10 पैकी 10 मार्क्स देत असल्याचे म्हटले आहे. तसेच एका युजरने, कुणी तरी या मुलाला मेडल द्या, असे लिहिले आहे.