मुंबई - लग्न हा जितका महत्त्वाचा विषय असतो, तितकाच तो चिडवण्याचा आणि विनोद करण्याचा विषय असतो. अनेकदा मित्र-मैत्रिणांना किंवा कुटुंबातील सदस्यांना लग्नावरुन, लग्नाच्या वयावरुन, प्रेमसंबंधावरुन चिडवलं जातं. कारण, लग्न ही प्रत्येकाच्या जीवनातील न चुकणारी गोष्ट आहे. त्याच लग्न या विषयावर शाळेतील विद्यार्थ्याला प्रश्न विचारला होत. मात्र, या विद्यार्थ्याने लग्नासंदर्भात असं काही भन्नाट उत्तर लिहिलं की, सोशल मीडियावर हा उत्तर निबंध व्हायरल झाला आहे. या उत्तरावरुन आता मजेशीर विनोद आणि मिम्सही बनत आहेत.
लग्न काय आहे? या प्रश्नावर एका विद्यार्थ्याने स्पष्टीकरणात्मक उत्तर दिलंय. ट्विटर युजर @srpdaa ने या निबंधाचा फोटो शेअर केलाय. त्यासोबतच माहितीही दिलीय. येथे एका विद्यार्थ्याने लग्न काय आहे? यावर उत्तरात एक निबंध लिहिला आहे. मात्र, विद्यार्थ्याचे उत्तर शिक्षकांना पसंत न पडल्याने गुरुजींनी विद्यार्थ्यास शुन्य मार्क दिले आहेत. तसेच, नॉन्सेन्स अन् मला येऊन भेट, असा शेराही लिहिलाय.
लग्न तेव्हाच होतं, जेव्हा मुलीचे आई-वडिल तिला म्हणतात की आता तू मोठी झाली आहेस. आम्ही तुला आता नाही खाऊ घालू शकत. त्यामुळे, तू असा मुलगा शोध जो तुझं पोट भरू शकेल. त्यानंतर, मुलगी एका मुलाला शोधते, दोघे एमेकांना भेटतात. दोघेही एकमेकांना जाणून घेतात आणि लग्नगाठ बांधतात. त्यानंतर, ते एकत्र राहतात आणि मुलांसाठी नॉनसेंस करतात, असे उत्तर या निबंधात विद्यार्थ्याने इंग्रजीत लिहिले आहे.
या विद्यार्थ्याचा हा निबंध सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी मजेशीर कमेंटसह हा रिशेअर केला आहे. तर, एकाने या मुलाला मेडल द्या, असेही म्हटलंय.