Moye Moye Meaning : सोशल मीडियावर लोक अलिकडे भरपूर रील्स बनवत आहेत. यूजर एकापाठी एक हे रील्स बघण्यात तासंतास घालवतात. यात वेळ कसा निघून जातो कळतंच नाही. रील्समध्ये ट्रेंड असतो. जे काही ट्रेंड होतं त्यावर भरभरून रील्स बनवले जातात आणि जे लाखो वेळा पाहिले जातात. सध्या सोशल मीडियावर 'मोये मोये'ने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
तुम्हीही सोशल मीडियावर मोये मोयेचे ट्रेंड रील पाहिले असतील. याच्या ओरिजनल व्हिडिओबाबत सांगितलं तर गाण्यात हे शब्द मोये मोरे असे आहेत. पण भारतात रील्समध्ये याला मोये मोये म्हटलं जातं. रील्समध्ये भरपूर वापरलं जाणारं हे गाणं मुळात सर्बियातील आहे. या गाण्यात मोये मोये पार्ट रील्समध्ये वापरला जात आहे. तुम्हीही अनेकदा या गाण्याचे रील्स पाहिले असतील. पण तुम्हाला या शब्दांचा अर्थ माहीत आहे का?
इन्स्टा असो वा फेसबुक सगळीकडे मोये मोये ट्रेंडचे रील्स बघायला मिळत आहेत. अनेक रील्समध्ये या गाण्याचाही वापर केला जात आहे. रीअल गाण्याचं टायटल डेजनम आहे. हे गाणं सर्बियातील सिंगर तेया डोराने गायलंय. यूट्यूबवर या गाण्याला 5 कोटींपेक्षा जास्त वेळ पाहिलं गेलं. आता यातील मोये मोये भागाचा वापर करून रील्स बनवले जात आहेत.
काय आहे याचा अर्थ?
मोये मोयेच्या अर्थाबाबत सांगायचं तर याचा अर्थ होतो वाईट स्वप्न. हे गाणं लोकांचं दु:खं, संघर्ष आणि पुन्हा पुन्हा येणारे वाईट स्वप्न दाखवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. भारतात जे रील्स ट्रेंड करत आहे, त्यातही लोकांच्या वेदना दाखवल्या जात आहेत. पण गमतीदार पद्धतीने. आतापर्यंत यावर लाखो रील्स बनवण्यात आले आहेत.