Viral Post : आजकालची लहान मुलं फारच हुशार झाली आहेत. त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तयार असतं. काही मुलं तर प्रश्नांची उत्तरं अशी देतात की, वाचून आपल्यालाच प्रश्न पडतो. मुलांची अनेक प्रश्नांची उत्तरे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका मुलाला पेनच्या वापराबाबत विचारण्यात आलं होतं. त्यानं दिलेलं उत्तर वाचून आधी तुम्ही कन्फ्यूज व्हाल. पण नंतर त्याला काय म्हणायचं आहे ते समजून येईल. या मुलाचं उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झालं असून शिक्षकानेही त्याचं कौतुक केलं आणि पैकीच्या पैकी गुण दिलेत.
या मुलाने पेनचा वापर काय या प्रश्नाच्या उत्तरात लिहिलं की, 'तुमचा पेन हरवला याचा अर्थ नो पेन. पेन नसेल तर नोट्स नाही. नोट्स नसतील तर अभ्यास नाही. अभ्यास नाही तर नोकरी नाही. नोकरी नसेल तर पैसा नाही. पैसे नसतील तर जेवण नाही. जेवण नसेल तर वजन कमी होईल. तुमच्यावर कुणी प्रेम करणार नाही. लव्हर नसेल तर लग्न होणार नाही. लग्न झालं नाही तर तुम्ही एकटे पडाल. एकटे पडल्याने तुम्ही डिप्रेशनमध्ये जाल आणि त्यानंतर तुम्ही मराल'.
https://www.instagram.com/reel/C89r3fkyeJQ/?utm_source=ig_web_copy_link
यानंतर त्याने शेवटी लिहिलं की, पेनशिवाय जीवन नाहीये. मुलाचं हे उत्तर वाचून शिक्षकाने त्याचं कौतुक केलं आणि त्याला पैकीच्या पैकी म्हणजे १० पैकी १० गुण दिलेत.
मुलाच्या या उत्तराची पोस्ट वाचून सोशल मीडिया यूजर्स अवाक् झाले आहेत. त्यांनी पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं की, नवीन पेन विकत घे. अशा अनेक मजेदार कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. तर अनेकांनी मुलाच्या हुशारीचं कौतुक केलं आहे.