आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. हातावर किंवा छातीवर आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव गोंदवून घेण्याचे प्रकारही अनेकदा घडतात. पण एका महिलेने चक्क आपल्या कपाळावर नाव गोंदवल्याचे समोर आले आहे. पतीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी महिलेने कपाळावर पतिचे नाव गोंदवले आहे. सध्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला बंगळुरुची रहिवासी आहे. तिचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, महिला टॅटू आर्टिस्टकडून तिच्या कपाळावर पतीचे नाव(सतीश) गोंदवून घेत आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये 'ट्रू लव्ह' असे लिहिले आहे.
पाहा Video:-
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यापासून 2.68 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे, तर 1.25 कोटींहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने म्हटले की, 'हा मूर्खपणा आहे. खरं प्रेम सिद्ध करण्याची गरज नसते. ते तुमच्या काळजी, आपुलकीतून येते.' आणखी एका यूजरने म्हटले की, 'अशा मूर्खपणाने तुमचे प्रेम सिद्ध करू नका.'