इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp गेल्या तासाभरापासून बंद झाले होते. दुपारी १२ वाजल्यापासून युजर्संना ही अडचण येत होीत, कोणत्याही पर्सनल किंवा ग्रुपवर मेसेज पाठवता येत नव्हते. अखेर २ तासापासून बंद असलेले व्हॉट्सअॅप पुन्हा सुरू झाले आहे, पण ट्विटरवर युजर्संनी मजेदार मीम्स बनवल्या आहेत, या मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
ट्विटरवर अनेकजण मीम्स शेअर करत आहेत. व्हॉट्सअॅप डाऊनबाबत यूजर्स विविध प्रकारचे मीम्स शेअर करत आहेत. मीम्समध्ये फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचीही खिल्ली उडवत आहेत.
साडे बारा वाजल्यापासून कोणाला मेसेज जात नाहीत की कोणाला मेसेज येत नाहीत, अशी गोष्ट घडू लागली. यानंतर काही वेळातच #whatsappdown हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. याचे कारण समजू शकले नव्हते. मेटा प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्हाला माहिती आहे की सध्या काही लोकांना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत. कंपनी 'शक्य तितक्या लवकर' सेवा रिस्टोअर करण्यासाठी काम करत आहे. जगभरात WhatsApp ला समस्या येत आहे. त्यानंतर अखेर २.१५ नंतर ही सेवा पुन्हा सुरू झाली.
युजर्सना अॅपवर Connecting लिहिलेलं दिसत होतं. त्यामुळे ते कोणालाही मेसेज पाठवू शकत नव्हते. दुपारी १२ वाजल्यापासून युजर्सना ही अडचण येत असून ते कोणत्याही पर्सनल किंवा ग्रुपवर मेसेज पाठवू शकत नव्हते. व्हॉट्सअॅपच्या मालकीची कंपनी Meta ने याबाबत आता माहिती दिली. "काही युजर्सना मेसेज पाठवण्यात समस्या येत आहेत. आम्ही ती समस्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी काम करत आहोत" असे त्यांनी म्हटले. त्यानंतर जगभरातील गोंधळ पाहता, व्हॉट्सअॅप सेवा तब्बल दोन तासांच्या प्रतिक्षेनंतर रिस्टोअर करण्यात आली.