सोशल मीडियावर सध्या जुने बील व्हायरल झाले आहेत. यात १९८६ चे बुलेटचे बील आहे. त्या काळात बुलेट फक्त १६ हजार रुपयांना मिळत होती, तर काही दिवसापूर्वी एका हॉटेलमधील बील व्हायरल झाले होते. या बीलात पनीरची भाजी फक्त २४ रुपयांना मिळत होती. हे बीलही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आता सोशल मीडियावर १९८७ चे एक बील व्हायरल झाले आहे, या बीलमध्ये त्या काळात गहूचे दर १.६ रुपये किलो होते. हे बील आयएफएस अधिकाऱ्याने शेअर केले आहे.
यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 2 जानेवारी रोजी भारतीय वन सेवेचे अधिकारी परवीन कासवान यांनी ट्विटरवर 1987 मधील 'फॉर्म J' चा फोटो पोस्ट केला आहे. त्यांनी हा फोटो शेअर करत एक कॅप्शन दिली आहे. 'हा तो काळ होता जेव्हा गहू 1.6 रुपये किलोने विकला जात होता... माझ्या आजोबांनी हा गहू 'फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ला विकला होता, अशी कॅप्शन या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 'त्या काळात आजोबांना सर्व रेकॉर्ड अगदी अचूक ठेवण्याची सवय होती. या कागदपत्राला 'जे फॉर्म' म्हणतात. गेल्या 40 वर्षांत विकल्या गेलेल्या पिकांची सर्व कागदपत्रे त्याच्या संग्रहात आहेत, असंही पुढं त्यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी बुलेटच्या बीलीचा फोटो व्हायरल झाला होता. 1986 मध्ये रॉयल इन फील्ड 350cc. हे बिल 23 जानेवारी 1986 चे आहे, जे सध्या कोठारी मार्केट, झारखंड येथे आहे. त्या काळात 350 सीसी बुलेट मोटरसायकलची ऑन-रोड किंमत 18,800 रुपये होती, जी सूट मिळाल्यानंतर 18,700 रुपयांना विकली होती.
वरमाला घालताना रोमॅन्टीक झाला नवरा; तिला उचलायला गेला, दणकन आपटला, पाहा Video
फेसबुक यूजर संजय खरे यांनी 27 नोव्हेंबर रोजी सायकलच्या बिलाचा फोटो शेअर केला होता. 'एकेकाळी 'सायकल' हे माझ्या आजोबांचे स्वप्न असले पाहिजे. सायकलच्या चाकाप्रमाणे काळाचे चाक किती फिरले आहे, हे 88 वर्षांचे बिल एका सायकल स्टोअरचे आहे, ज्यावर दुकानाचे नाव 'कुमुद सायकल वर्क्स' आणि पत्ता कोलकाता आहे. यामध्ये सायकलची किंमत फक्त 18 रुपये आहे.