ऑस्ट्रेलियातील आगीने एक अब्जाहून अधिक प्राण्यांचा बळी घेतला. इतर कोट्यावधी लोकांवर त्याचा परिणाम झाला. अनेक वन्यजीव आगीत होरपळून जाऊन प्राण्यांची ताटातूट झाली. ऑस्ट्रेलियन अधिकारी आकाशातून अन्न खाली टाकत आहेत. जेणेकरून या भयंकर आगीमध्ये जिवंत राहिलेले प्राणी उपासमारीने मरणार नाहीत.
ऑस्ट्रेलियाच्या महाभयंकर आगीत आपल्या आईला गमावलेल्या कोआलाला स्तनपान करत असलेल्या कोल्हीणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात भुकेलेला कोआलाचे पिल्लू तिच्याकडून आहार घेत असताना आई कोल्हीणने संयमाने उभी असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात वायरल होत आहे. पण हा व्हिडीओ खोटा असल्याचं समोर येत आहे.
या व्हिडीओवर बर्याच लोकांनी आईच्या प्रेमाच्या महानतेबद्दल टिप्पणी केली. ‘आई एक आई आहे’, असं एका व्यक्तीने टिप्पणी दिली. संकटाच्या पार्श्वभूमीवर जनावरे एकत्र येऊन एकमेकांवर विसंबून राहतात हे पाहून खरोखर आनंद होतो. पण हा व्हिडीओ फेक आहे. कारण ज्यावेळी हा व्हिडीओ काढण्यात आला तेव्हा ती कोआला कोल्हीणीचं दूध पिताना दाखवलं आहे. पण सुरूवातीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर दिसून येत आहे की ते कोल्हीणीचीचं पिल्लं आहेत.
खोटा व्हिडीओ
खरा व्हिडीओ