काही घटना अशा असतात की त्या पाहणाऱ्यांना आश्चर्यचकित करुन सोडतात. अशीच एक घटना घडलीये मेक्सिकोमध्ये. येथील युकाटन पेनिसुला येथे समुद्रात आग धगधगण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहताच तुमच्या अंगावर शहारे येतील. त्याच झालं असं की, मेक्सिकोच्या युकाटन पेनिसुला या भागात समुद्रातच आगीने रौद्र रुप धारण केले होते. त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले पण त्याची दृश्य पाहिल्यावर तुमच्या वाटेल की हा धगधगता लावा आहे. हे पाणी आहे यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.\
हा व्हिडिओ ट्वीटरवर मॅन्युल लोपेझ सॅन मार्टीन याने शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहेपर्यंत ३० मिलियन व्हिव्ज, ९० हजार लाईक्स आणि ६८ हजार रीट्वीट्स मिळाले होते. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की तीन बोटी पाण्याच्या फवाऱ्याद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मेक्सिकोच्या सरकारी पेट्रलियम कंपनीच्या समुद्रातील पाईपलाईनमध्ये गळती झाली आणि ही आग लागली.