भारतीय रेल्वेच मोठ जाळ आहे. देशात लांबचा प्रवास करण्यासाठी ट्रेन फायद्याची आणि आरामदायी मानली जाते. ट्रेनने प्रवास केल्याने आपला वेळ वाचतो आणि पैशांचीही बचत होते. भारतीय ट्रेन जगातील 4 सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कमध्ये सामील झाले आहे. तुम्हाला देशात कुठेही जायचे असेल तर ट्रेन हा उत्तम पर्याय आहे आणि त्यात प्रवास करणे सुरक्षित आहे.
ट्रेनमध्ये प्रवास केल्याने पैशांची बचत होते, पण आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात महागड्या ट्रेनची ओळख करून देणार आहोत. या ट्रेनमध्ये अशी सुविधा आहे जी तुम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्येही मिळणार नाही. ट्रेनमध्ये प्रवेश करताच तुम्ही जगातील सर्वोत्तम हॉटेलमध्ये पोहोचल्याचा भास होईल.
महाराजा एक्सप्रेस ट्रेन इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारे चालवली जाते. महाराजा एक्सप्रेस ही भारतातील सर्वात महागडी ट्रेन असल्याचे म्हटले जाते. ही ट्रेन 7 दिवस चार वेगवेगळ्या मार्गांवर प्रवास करते. ज्यात 'द इंडियन पॅनोरमा', 'ट्रेझर्स ऑफ इंडिया', 'द इंडियन स्प्लेंडर' आणि 'द हेरिटेज ऑफ इंडिया' या मार्गांचा समावेश आहे. ट्रेनच्या आत, तुम्हाला एक बैठकीची खोली मिळते ज्यामध्ये सोफा-टेबल ठेवलेले असते. आतील बेडरूमची रचना अतिशय सुंदर आहे आणि त्यामध्ये टीव्हीसह आवश्यक सुविधाही उपलब्ध आहेत. त्याच्या दुसऱ्या बेडरूममध्ये तुम्हाला दोन बेड मिळतात. यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला सुमारे 19 लाख रुपये मोजावे लागतील.
या ट्रेनमध्ये विमानासारखी सुविधा देण्यात आल्या आहेत. याच्या दरवाज्यांना भन्नाट लूक देण्यात आला आहे आणि आतील आतील रचना देखील अतिशय अनोखी दिसते. या ट्रेनमध्ये तुम्हाला पूर्णपणे शाही व्यवस्था मिळते.