Student Viral Answer Sheet: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहमीच अशा गोष्टी व्हायरल होत असतात ज्या पोटधरून हसायला किंवा हैराण व्हायला भाग पाडतात. शाळेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे स्क्रीनशॉट्स देखील व्हायरल होत असतात. एका विद्यार्थ्याची अशीच एक उत्तरपत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात विद्यार्थ्याने असं काही उत्तर दिलं जे वाचून सगळेच अवाक् झाले आहेत.
व्हायरल झालेल्या या उत्तरपत्रिकेत प्रश्न विचारण्यात आला होता की, "डॉक्टर कोण आहे?". याचं जबरदस्त उत्तर विद्यार्थ्याने दिलं आहे. विद्यार्थ्याने दिलेलं उत्तर इतकं खरं आणि प्रॅक्टिकल होतं की, लोक वाचून हसून लोटपोट होत आहेत. तर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन विद्यार्थ्याचं कौतुक करत आहेत.
इंग्रजीमध्ये प्रश्न विचारण्यात आला की, "डॉक्टर कोण आहे?". यावर त्याने उत्तर लिहिलं की, 'डॉक्टर तो आहे जो औषधं देऊन तुमच्यावर उपचार करतो आणि मग मोठं बिल देऊन तुम्हाला इजा पोहचवतो'. हे उत्तर वाचून शिक्षकाने सुद्धा विद्यार्थ्याला पाचपैकी पाच गुण दिले आणि वरून 'व्हेरी गुड स्टूडेंट' असा रिमार्कही दिला आहे.
हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @VishalMalvi_ नावाच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टला आतापर्यंत ७ लाख ४० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.