सोशल मीडियावर तुमच्या कलागुणांचं नेहमीच कौतुक होतं. तुमच्यातला चांगुलपणा लोकांना आवडतो तर तुमचा उद्धटपणाही लोकांना खटकतो. मात्र, या दोन्ही प्रकारातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दूरपर्यंत पोहोचवलं जात. सोशल मीडियावर असे कॅरेक्टर काही तासांतच व्हायरल होत असतात. गेल्या २ ते ३ दिवसांपासून सोशल मीडियावर एका वैमानिकाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. आपल्या काव्यपंक्तींतून विमानातील प्रवाशांचे स्वागत करत त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. तो पायलट नेमका कोण, याची माहिती तुम्हाला येथे वाचायला मिळेल.
मोहित तेवतिया असं या पायलटचं नाव असून यापूर्वीही त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. डिसेंबर २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यात याच पायलटचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. दिल्ली येथून श्रीनगरला जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाने या पायलटचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये वैमानिकाचा केवळ आवाज ऐकू येतो, पण तो वैमानिक दिसून येत नाही. ज्या मजेशीर आणि काव्यात्मक पद्धतीने वैमानिकाने प्रवाशांचे स्वागत केले, ते प्रवाशांसह नेटीझन्सला खूप आवडले. त्यामुळे, या वैमानिकाचे कौतुक होत आहे.
जरा दें फेफड़ों को आराम और ना करें धूम्रपान, वरना दंडनीय हो सकता है अंजाम। यासह मजेशीर फ्लाईट अनाऊंसमेंट मोहित तेवतिया यांनी केली आहे. इंस्टावर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे, ते सध्या चांगलेच चर्चेत आहेत. दरम्यान, पायलट मोहित तेवतिया हे सध्या स्पाईस जेट या विमानात कार्यरत आहेत.