नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,80,47,534 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,52,734 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,128 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,29,100 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय केले जात आहे. कोरोनाच्या संकटात लहान मुलांना संसर्ग होऊ नये म्हणून शाळा, महाविद्यालये ही ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिलं जात आहे. याच दरम्यान एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
लहान मुलांना इतकं काम का असतं मोदी साहेब? असं म्हणत चिमुकलीने थेट पंतप्रधानांकडे तक्रार केल्याची घटना समोर आली आहे. काश्मीरच्या एका सहा वर्षांच्या मुलीने आपली तक्रार सांगितली आहे. लहान मुलांना इतकं जास्त काम का असतं? मी इतकी लहान आहे, तरी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत माझे क्लास सुरू असतात. इंग्रजी, गणित, कॉम्प्यूटर असे असतात असं मुलीने म्हटलं आहे. इतकं जास्त काम तर मोठ्या मुलांना असतं. जी सातवी ते दहावीची असतात. मी तर खूप लहान आहे आणि मला इतकं काम का दिलं जातं... आता काय करायचं? असा सवाल लहा मुलीने व्हिडीओमध्ये केला आहे.
एका व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर तो तुफान व्हायरल झाला आहे. लहान मुलीचा हा क्यूट व्हिडीओ अनेकांना भावला असून तो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. सहा वर्षांच्या या चिमुकलीचं कौतुक देखील केलं जात आहे. नेटीझन्सना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 50 दिवसांतील नीचांक आहे.
मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 1,52,734 नवे रुग्ण; 50 दिवसांतील नीचांक
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,52,734 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,128 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,80,47,534 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3,29,100 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (31 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 52 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे.