जंगलातील प्राणी दुरून किंवा एका ठराविक अंतराहून बघायला भारी वाटतं. पण जर जंगलात अजगर, अस्वल किंवा वाघासारख्या प्राण्याने तुमचा पाय पकडला तर व्यक्तीची काय हालत होत असेल. सोशल मीडियातील एका व्हिडीओत अशीच स्थिती बघायला मिळाली. या व्हिडीओत काही तरूणी जंगलात फिरत आहेत. पण अचानक त्यांच्याजवळ एक अस्वल येतं. त्याने काही करू नये म्हणून तरूणी एकाच जागी उभ्या राहतात. त्या घाबरलेल्या होत्या. पण शांत होत्या. मात्र, ही शांतताच त्यांच्या फायद्याची ठरली.
दुसरा व्हिडीओ...
हा शॉकिंग व्हिडीओ रविवारी आयएफएस सुशांता नंदाने ट्विटरवर शेअऱ केला. त्यांनी याच्या कॅप्शनला लिहिले की, 'वाचणं कठिण होतं'. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत ८ हजारांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आणि ७०० पेक्षा जास्त लाइक्स याला मिळाले आहेत. हा व्हिडीओ मेक्सिकोतील चिपींक इकोलॉजिकल पार्कातील असल्याचे सांगितले जात आहे.
एका दुसऱ्या यूजरने या व्हिडीओचा दुसरा अॅंगलचाही व्हिडीओ शेअर केलाय. त्याने लिहिले की, हा व्हिडीओ दुसऱ्या अॅंगलने शूट केलाय, जो एक मिनिटाचा आहे. नंदा यांनी जो व्हिडीओ शेअर केलाय. तो केवळ १० सेकंदाचा आहे. पण दोन्ही व्हिडीओत महिलांची भीती आणि हिंमत बघायला मिळते.
या व्हिडीओत बघू शकता की, तीन तरूणी एकमेकींपासून काही अंतरावर उभ्या आहेत. त्या सेल्फी घेत आहेत. अचानक एक काळ्या रंगांचं अस्वल त्यांच्या जवळ येतं आणि बाजूला उभं राहतं. यातील एका मुलीला तो पकडण्याचा प्रयत्नही करतो. नंतर तिचा पायाचा चावण्याचा प्रयत्न करतो. पण मुली शांत राहतात आणि ते अस्वलही तेथून निघून जातं.
Video : झाडावर इतका लांब साप चढताना पाहून लोकांना आठवला Anaconda, तुम्ही कधी पाहिला का?