दररोज सोशल मीडियावर वन्यजीवांचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. वन्यजीव छायाचित्रकार(Wild Life Photographer) हे फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपत असतात. तासनतास बसून केलेले निरीक्षण आणि अचूनक टायमिंगमुळे एकापेक्षा एक भन्नाट फोटो आपल्याला पाहायाल मिळतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो तीन चित्त्यांचा आहे, जो पाहून तुम्हीही चकीत व्हाल. या फोटोत एकाच चित्त्याला तीन डोकी आहे का, असा प्रश्न तुमच्या मनात येईल.
जगभरात पूर्वी चित्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. पण, कालांतराने चित्ता नामशेष होण्याच्या मार्गावर आला. सध्या आफ्रिकेच्या जंगलातच काही प्रमाणात चित्ते आढळतात. याच आफ्रीकेच्या जंगलातील या तीन चित्त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
फोटोसाठी फोटोग्राफरने पावसात 7 तास घालवलेहे अप्रतिम फोटो विम्बल्डनचे वन्यजीव छायाचित्रकार पॉल गोल्डस्टीन यांनी आपल्या कॅमेराने टिपले आहेत. केनियातील मसाई मारा नॅशनल पार्कमध्ये हे चित्ते त्यांना दिसले. चित्ते या पोझिशनमध्ये येताच फोटोग्राफरने तात्काळ त्यांचा फोटो कॅमेऱ्यात कैद केला. पॉल गोल्डस्टीनने एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ही छायाचित्रे घेण्यासाठी त्याने 7 तास पावसात भिजत घालवले.
पॉल गोल्डस्टीनने आपल्या सोशल मीडिया हँडलवर ही छायाचित्रे शेअर केली आणि आपला आनंद व्यक्त केला. तुम्हीही हा फोटो पाहिला तर, वाटेल एका बिबट्याला तीन डोकी आहेत की काय.. फोटोग्राफरच्या अचूक टायमिंगमुळे हा खास फोटो जगासमोर आला आहे. फोटो पाहिल्यानंतर लोकांच्या तोंडून एकच वाक्य बाहेर पडते, ते म्हणजे व्वा! काय अचूक टायमिंग आहे? सोशल मीडियावरही सर्वजण पॉल गोल्डस्टीनच्या या शानदार फोटोग्राफीचे कौतुक करत आहेत.