लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ब्रिटनमधील ३० वर्षीय ॲनाबेल मॅगिनीस नामक महिलेने आपल्या आईच्या किचनमध्ये आपल्या मैत्रिणींची नखे साफ करताना ‘नेल आर्ट’मध्ये कौशल्य मिळविले. यात ती इतकी कुशल झाली की, हाच तिचा व्यवसाय बनला आणि या व्यवसायाच्या बळावर ती आता कोट्यधीश झाली आहे.
ॲनाबेलचे ‘नेल आर्ट’ समाज माध्यमांवरही व्हायरल झाले आहे. तिचे साडेसात लाखांपेक्षा जास्त ऑनलाइन फॉलोअर्स आहेत. १० वर्षांपूर्वी आपल्या आईच्या किचनमध्ये छोटा सेटअप लावून तिने ‘नेल आर्ट’चे काम सुरू केले होते. सुरुवातीला तिच्या आईच्या मैत्रिणी तिच्या ग्राहक होत्या. थोडा जम बसल्यानंतर तिने स्टेफाेर्डशायरमध्ये सलून उघडले. तिथे तिने ‘युनिकॉर्न थीम नेलआर्ट’ सुरू केले. हे डिझाइन प्रचंड लोकप्रिय झाले. तिची फीस लाखो रुपये आहे.
याशिवाय समाज माध्यमांतूनही ती मोठी कमाई करते. ॲनाबेलने २०१८ मध्ये आपले स्वत:चे सलून सुरू केले होते. आता ॲनाबेलने आपले सलून ५५ हजार चौरस फुटांच्या वेअरहाऊसमध्ये स्थलांतरित केले आहे.