लॉकडाऊनमध्ये एका तहानलेल्या खारूताईचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओत खारूताई रस्त्यावरच्या माणसाच्या हातून पाणी पीत होती. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक खारूताई महिलेच्या हातून केळी खात आहे. आयएफएस अधिकारी सुशांतनंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.
''सगळ्याच प्राण्यांबाबत दया दाखवणं हाच खरा धर्म आहे.- बुध्द'' असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता एक महिला खारूताईला पाहून तिच्यासमोर केळं ठेवते त्यानंतर लगेचच खारूताई धावत येऊन केळी खाण्याचा प्रयत्न करते. आधी इकडे तिकडे बघते मग नंतर ही खारूताई आवडीनं केळी खाते. खारूताईचे असे क्यूट हावभाव पाहून सगळ्यांनाच आनंद झाला आहे.
व्हिडीओतील महिला खारूताईला केळी सोलून देत आहे. त्यामुळे लोकांना या महिलेवरही कौतुकाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. १६ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून या पोस्टवर २ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि २०० पेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत.
काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या तहानलेल्या खारूताईच्या व्हिडीओला सोशल मीडिया युजर्सनी खुप पसंती दिली होती.
हे पण वाचा-
काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ
शोधा म्हणजे सापडेल! केजरीवालांच्या 'या' दोन फोटोंमधील १० फरक ओळखून दाखवा
बापरे! खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढायच्या नादात 'असं' काही झालं; पाहा व्हायरल व्हिडीओ
लय भारी! कोरोनाच्या भीतीनं पाणीपुरीवाल्यानं केलेला जुगाड पाहून म्हणाल; वाह क्या बात है...