एका महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपल्या मोठ्या भावाचं एक नोटबुक शेअर केलं आहे. जे तिला त्याच्या कपाटाची सफाई करताना सापडलं हों. तिच्या भावाचा 11 वर्षाआधी मृत्यू झाला होता. तेव्हा ती केवळ 1 वर्षाची होती. या नोटबुकमध्ये लिहिलेल्या गोष्टी वाचून महिला इमोशनल झाली. यात तिच्या भावाने तिच्याबाबत अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. त्याने लिहिलं की, मोठा भाऊ बनल्याने तो फार उत्साहित होता. महिलेने सोशल मीडियावर आपलं नाव बुट्टा सांगितलं आहे.
बुट्टाच्या भावाने लिहिलं होतं की, त्याला आशा आहे की, त्याची बहीण मोठी झाल्यावर त्याच्यासारखी होईल. ही पोस्ट शेअर कऱण्याआधी बुट्टाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, मी मुळात त्याचे अनेक नोटबुक वाचले आहेत, पण हे फार वेगळं होतं. हे नोटबुक फार छोटं होतं. पण जीवनाबाबत फार समजदारी आणि गंभीर वाटत होतं.
16 जानेवरी 1998 मध्ये तारीख असलेल्या या नोटचं टायटल होतं 'माझी बेबी सिस्टर'. यात बुट्टाच्या भावाने पुढे लिहिलं की, माझ्या छोट्या बहिणीचा जन्म झाला. ती पाच दिवसांची आहे आणि फार लहान आहे. माझी बहीण मोठी होणार आणि माझ्यासारखीच शाळेत जाणार. माझी बहीण काय बनणार हे तेव्हाच समजेल जेव्हा ती बोलायला लागेल. माझं माझ्या आईवर आणि बहिणीवर प्रेम आहे. मला आशा आहे की, माझी बहीण मोठी झाल्यावर माझ्यासारखी होईल.
बुट्टाने आपल्या भावाचा फोटो शेअर करत लिहिलं की, माझा भाऊ फार प्रेमळ होता आणि बरेच लोक त्याच्यावर प्रेम करत होते. त्याने एक चांगलं जीवन जगलं. मला आनंद आहे की, हे नोटबुक मला सापडलं. कारण यात अनेक गोष्टी विस्ताराने सांगितल्या आहेत. त्याचं निकनेम बुट्टा होतं आणि मलाही त्याच्या निकनेमने ओळखलं जातं. मी मोठी होऊन त्याच्यासारखीच झाली आहे.